MB NEWS:ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा

 ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा ॲड.माधव जाधव यांची मागणी





वीज ग्राहकांची हेळसांड थांबवून वीजपुरवठा सुरळीत करावा -ॲड.माधव जाधव यांची मागणी



परळी / प्रतिनिधी दि.११ - ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा.वीज ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवून सतत खंडित होत वीजपुरावठा सुरळीत करावा अशी मागणी किसान कांग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.गेले सहा महिन्यांपासून वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढलेले असतांनाच याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचेही जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे.ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवानाही नियमित वीजपुरवाठा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


महावितरणच्या परळी येथील कार्यालयात साधारण अडीच ते तीन वर्षांपासून पुर्ण वेळ अधिकारी भेटलेला नाही.यामुळे आपत्कालिन सुविधेत मोडणारी महावितरण ची असलेलीही व्यवस्था ढासळत चालली आहे.ज्योतिर्लिंग स्थान असतानाही महावितरण प्रशासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही.पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने परळी महावितरण चा बोजवारा उडालेला दिसत आहे.याचा परिणाम थेट वीजवितरण व्यवस्थेवर होत असून पूर्णवेळ अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करावी. बाजारपेठ,गाव भागासह परळी तालूक्यातील वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण महिनाभरात वाढले आहे.यामुळे नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.


अवकाळी पावसाने वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढलेले असून घरातले फॅन - कूलर खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे बंदच राहत असून अबाल वॄद्धांचे हाल होत आहेत.अनियमित होणाऱ्या वीजपुरवठ्याने घरातील विद्युत उपकरणांचे नुकसानही होत आहे.वीज ग्राहकांकडुन याबाबत महावितरण कडे चौकशी केली असता ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तर महावितरण कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत. एकीकडे वीजपुरावठा सुरळीत होत नसतांना दुसरीकडे मात्र याची विचारणा कारणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांना महावितरण कडून दिली जाणारी अपमानास्पद वागणूक बंद करावी.वीज ग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा करावा.वीज ग्राहकांच्या अनेक समस्या असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे. वरील समस्या न सोडविल्यास आंदोलन करणार असल्याचेही ॲड.माधव जाधव यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार