MB NEWS:रविवारी पक्षघात जनजागृती व मोफत आरोग्य तपासणी शिबीर...

 शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन.. शनिवारी भव्य शोभायात्रा

रविवारी पक्षघात जनजागृती व मोफत आरोग्य तपासणी शिबीर...


परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)

        येथील शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनैश्वर जन्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता.१३) ते रविवार (ता.२०) करण्यात आले आहे.

         येथे दरवर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर व सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या प्रेरणेने अखंड शिवनाम सप्ताह, श्री.ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात शनिवारी (ता.१३) ते रविवार (ता.२०) पर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता.१९) संध्याकाळी ७ वाजून ०७ मिनिटांनी शनैश्वर जन्मोत्सव साजरा होईल, यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हा महाप्रसाद शनिमंदिर मध्ये होणार आहे.  त्याचबरोबर शनिवारी (ता.१३) सकाळी ८ वाजता शोभायात्रा हनुमान मंदिर मोंढा येथून राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक मार्गे शनी मंदिरात काढण्यात येणार आहे.तसेच रविवारी (ता.१४) भव्य रक्तदान शिबीर व महाआरोग्य शिबीर  सकाळी आठ ते पाच यावेळेत आयोजित केले आहे. आरोग्य शिबीरात पक्षघात जनजागृती,मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.धार्मिक कार्यक्रमात रोज सकाळी शिवपाठ, परमरस्य पारायण, शनि महात्म्य पारायण, गाथा भजन, प्रवचन आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. शनिमंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.  दरम्यान शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनिमंदिर जिर्णोद्धार सुरू करण्यात आला आहे.जवळपास चार कोटी रुपये खर्च करुन मंदिराची नियोजित वास्तू उभी राहत आहे.यामध्ये भाविकांसाठी भव्य असे भक्त निवास,मंदिराची वास्तू उभी राहत आहे. या मंदिराचे बरेचसे काम पुर्ण होत आले आहे. तरी भाविक भक्तांनी या जिर्णोद्धारास आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !