इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS: अभिष्टचिंतन: शब्दप्रभू - प्रशांत जोशी >>>✍️धनंजय आरबुने

 शब्दप्रभू - प्रशांत जोशी 

नियोजन करावे ते प्रशांतने. वर्षातून दोन ते तीन वेळेस उर्जादाई भ्रमंतीची आवड जोपासत आपल्या सहित इतर मित्रांनाही घराबाहेर काढून वेग वेगळी शहरें, निसर्ग सौंदर्य सहली, ठरवून त्याचे निघण्या पासून ते घरी परत  येण्यापर्यंत, सहलीच्या ठिकाणी राहणं, जेवणं या बाबीचे अतिशय सुरेख नियोजन म्हणजेचं प्रशांत. 


भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणी चार मित्र जोडावे ते प्रशांतनेचं.नेहमीचं आनंद आणि विनोदांची फुलअतिषबाजी करणारा प्रशांत.. !


बातमीदार, संपादकीय व्यवस्थापन, जाहिरात डिझाईन, केबल टीव्ही चा वृत्त निवेदक, संगीताचा जाणकार, गेल्या अनेक वर्षांपासून संगीत प्रेमी साठी रोजचं एक सुमधुर गीतं आपल्या हजारो मित्रांना नचूकता बरोबर रात्री १०  च्या सुमारास पाठवावे ते प्रशांतनेचं.


जिल्ह्याचं न्हवे तर अख्या महाराष्ट्रात सन्मान पत्र आणि त्यांचे लिखाण,ते दृष्य रूप करण्याचं कल्पकता करावी ती प्रशांतने....


सूत्रसंचालन करून कार्यक्रमांची उंची वाढवणारा तो प्रशांतचं...!


रोटरी इंटरनॅशनल च्या माध्यमातून सूत्रसंचालन करण्याचें धडे मी त्यांच्या कडूनचं घेतलें. बातमीत नेमकं काय हवं, बातमीतील शब्दाचा वापर कसा हवा या बाबतींत सातत्याने मला प्रोत्साहन देणारा माझा गुरूंमित्र....!


नेहमीचं आनंद आणि विनोदाची  फुलअतिषबाजी करणारें माझें मित्र...!!


प्रशांत प्र जोशी , 

कार्यकारी संपादक दैनिक मराठवाडा साथी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!💐

      - धनंजय आरबुने, पत्रकार परळी वैजनाथ. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!