MB NEWS:विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणारी परळीची लावण्याई पब्लिक स्कूल

 विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणारी परळीची लावण्याई पब्लिक स्कूल


परळी वैजनाथ  

................

सध्याच्या स्पर्धेच्या जगामध्ये आपला पाल्य टिकला पाहिजे व तो सर्वोत्तम असला पाहिजे असा प्रत्येक पालकांचा अट्टहास असतो. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. विद्यार्थ्यांच्या क्षमता, त्यांचा कल, त्यांच्या अंगातील उपजत गुण व संस्कार यांना प्राधान्य देणाऱ्या शाळेच्या शोधामध्ये सर्वच ठिकाणी पालक असतात. या पालकांना हवी असते विद्यार्थ्यांची सृजनशीलता, कल्पकता व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारी शाळा!

 परळी वैजनाथ मध्ये अल्पावधीमध्येच   लावण्याई पब्लिक स्कूलने दूरदृष्टी व सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील सर्व इच्छा आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे सृजनशील प्रकल्प सातत्याने राबविले आहेत. या शाळेत येणारे अनेक विद्यार्थी हे अत्यंत गरीब असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे इंग्रजी माध्यमाची शुल्क त्यांना परवडणारी नसते. ही अडचण ओळखून सामाजिक भावना ठेवून या संस्थेचे संस्थापक गिरवलकर साहेब व शाळेचे  अध्यक्ष पत्रकार अनंत कुलकर्णी यांनी अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत देऊन विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील शिक्षण अत्यंत माफक मध्ये देण्यासाठी परळी शहरांमध्ये अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू केले आहेत.

इंग्रजी माध्यमाची अत्यंत दर्जेदार व सामान्य विद्यार्थ्यालाही परवडेल इतकी शैक्षणिक शुल्क असणारी शाळा परळी सारख्या विकसनशील शहरांमध्ये या संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या पायाभूत संकल्पना व राष्ट्रीय स्पर्धात्मक परीक्षेसाठी आवश्यक असणारा गणित व विज्ञान विषयाचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने सीबीएसई पॅटर्न इयत्ता आठवी पर्यंत राबविण्याचा संकल्प केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन व त्यांच्या शैक्षणिक अडचणी समजून घेऊन त्याला शिकण्यासाठी मदत करणारा इथला शिक्षक वृंद हा विद्यार्थ्यांच्या चौफेर प्रगतीकडे सतत लक्ष देतो. वर्षभर या शाळेमध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या क्षमतांची संवर्धन करण्याचे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबविले जातात. सांस्कृतिक कार्यक्रमांची या शाळेमध्ये रेलचेल असते विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाच्या विकासासाठी वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. त्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध लेखन, विज्ञान प्रदर्शन, प्रकल्प भेटी, समाजातील मान्यवर व्यक्तींच्या व अधिकाऱ्यांच्या शाळेला भेटी व त्यातून विद्यार्थ्यांना आकलन होणारे त्यांचे व्यक्तिमत्व यासारखे उपक्रम राबविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान वाढते तसेच त्यांना समाजातील प्रश्न पडतात व यातून चांगले देशभक्त विद्यार्थी व सुसंस्कारित पिढी निर्माण होते हा उद्देश संस्थाचालक श्री.गिरवलकर साहेबांनी डोळ्यासमोर ठेवून ही शाळा पत्रकार अनंत कुलकर्णी यांना चालवण्यासाठी दिली व एका वर्षामध्ये अनंत कुलकर्णी यांनी अखंड परिश्रम घेऊन या शाळेचा नावलौकिक परळी शहरांमध्ये वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. त्या सर्व उपक्रमांना विद्यार्थी व पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला. समाजातील चांगले अधिकारी, समाजसेवक इंजिनियर, डॉक्टर, शास्त्रज्ञ, कृषी संशोधक यांना या शाळेमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जातात व या सर्व मान्यवरांचे शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळते यामुळे विद्यार्थ्यांना आपले रोल मॉडेल निश्चित करण्यासाठी मदत होते.

दर महिन्याला शाळेमध्ये पालक व विद्यार्थ्यांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत पालकांना कौन्सिलिंग केले जाते. ज्यामुळे आपल्या पाल्याच्या सकारात्मक व नकारात्मक गोष्टी पालकांना ज्ञात होतात. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कमकुवत गोष्टीवर ध्यान केंद्रित करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून तसेच स्लो लर्नर विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविले जाते. त्यामुळे या ठिकाणी कोणताही विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये मागे पडत नाही सर्वच विद्यार्थी एका पातळीवर असल्यामुळे वर्गामध्ये चांगली स्पर्धा निर्माण होते व सर्वच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्याबरोबरच व्यक्तिमत्त्वाचाही विकास होतो त्यामुळे हे विद्यार्थी अष्टपैलू बनतात. विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्याचा विकास यांच्यातील लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यासाठी तज्ञ व्यक्तींना बोलावले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास वेगाने घडतो.

सध्याच्या वेगाने वाढणाऱ्या रॅटच्या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या भावनांकालाही  ( Emotional Quotient) खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांची ऍनालिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स, रॅशनल थिंकिंग या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी या ठिकाणी असणारा तज्ञ शिक्षक वृंद सतत प्रयत्न करत असतो. अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांचा विकास घडवून आणला जातो. त्यामुळे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या मधील सुप्त गुण विकसित करण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू घडविण्यासाठी निश्चितच लावण्याई स्कूलला भेट देऊन तेथील उपक्रमाची माहिती घ्यावी असे पालकांना सुचवावेसे वाटते. 


अनंत कुलकर्णी  

अध्यक्ष  लावण्याई पब्लिक स्कूल  परळी

---------------------------


Advertise 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला