MB NEWS:श्री.शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न

 श्री.शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न

रविवारी डॉ. फत्तेपुरकर यांचे पक्षघात जनजागृती व मोफत आरोग्य शिबीरासह रक्तदान शिबीर

परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)

         भजनाच्या तालावर पावली खेळत चालणाऱ्या, एकाच रंगाच्या आकर्षक साड्या घालून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या तसेच मंगल कलश मस्तकी धारण केलेल्या, हाती भगवा निशाण फडकावत मुखी गुरुराज माऊलीचा गजर करणाऱ्या महिला भगिनी आणि पांढऱ्या शुभ्र पोशाखात दोन-दोनच्या रांगेत शिस्तीने चालणाऱ्या पुरुषांनीही श्री शनैश्वर जन्मोत्सवाच्या आणि अखंड शिवनाम सप्ताह निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेची शोभा वाढवली.

     येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी श्री.शनैश्वर मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा प्रथमच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभा यात्रेची सुरुवात मोंढा मैदानातील हनुमान मंदिरापासून झाली. 

नियोजनानुसार महिला भगिनींनी भगव्या पताका, मंगल कलश, एकाच रंगाच्या साड्या, परमरहस्य ग्रंथाचे पथक, तसेच शाळकरी मुलांचे छोटे लेझीम पथक तर पुरुष मंडळींनी पांढराशुभ्र पोशाख आणि शिस्तीत गुरुराज माऊलीचा जयघोष करत या शोभायात्रेत सहभाग घेतला. श्री हनुमान मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा राणी लक्ष्मीबाई टावर मार्गे श्री शनि मंदिरात पोहोचली. राणी लक्ष्मीबाई टावर जवळ आणि तळ भागात येताच या शोभायात्रेचे स्वागत आकर्षक फटाके वाजवून करण्यात आले. वैद्यनाथ मंदिराच्या प्रांगणात श्री शनी मंदिर समोर शोभा यात्रेचे आगमन झाल्यानंतर महिला भगिनींनी सुंदर रिंगण करून टाळ, मृदंग आणि ढोल ताशाच्या तालावर गुरुराज माऊलीचा जयघोष केला. 

ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी तेली समाजाच्या तरुण मंडळी,शनी भक्त, महिला मंडळ, ज्येष्ठ मंडळींनीही प्रयत्न केला.

---------------------------------------------------

  दरम्यान श्री.शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्यात रविवारी (ता.१४) पक्षघात जनजागृती व मोफत आरोग्य शिबीरासह रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीरात न्युरो सर्जन तथा मेंदू व मणकाविकार तज्ञ डॉ. सुधीर चंद्रकांत फत्तेपुरकर (लातूर), तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे,डॉ राजाराम मुंडे, डॉ संतोष मुंडे,डॉ. पांडुरंग फड, डॉ वैशाली गंजेवार,डॉ शिरीष आघाव, डॉ कुलदिप जैन यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबीर संपन्न होणार आहे. या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

--------------------------------------------------------


Advertise 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार