MB NEWS:ऑपरेशन लोटस् ची भिती : काँग्रेस सतर्क : कोणतीही रिस्क नको

 ऑपरेशन लोटस्  ची भिती : काँग्रेस सतर्क : कोणतीही रिस्क नको 

बंगळूर, : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने बहुमताची आघाडी आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने ११3 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने ७६ जागांवर आणि जेडीएसने ३० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसने सरकार स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसने त्यांच्या आमदारांना बंगळूरमध्ये आज येण्यास सांगितले आहे. आमदारांना बंगळूरला नेण्यासाठी राज्यातील दुर्गम भागातही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. (Karnataka Election Results 2023) कर्नाटकात काँग्रेसला 'ऑपरेशन कमळ'ची धास्ती असून त्यांनी त्यांचा आमदारांना बंगळूरला आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असल्याचे समजते.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळवून स्वबळावर पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटकच्या हितासाठी आपले वडील मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. “भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. राज्याच्या हिताच्या दृष्टीने माझ्या वडिलांनी मुख्यमंत्री व्हावे,” असे यतींद्र सिद्धरामय्या यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. "आम्ही प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करू. यात काही शंका नाही. पंतप्रधानांच्या प्रचाराचा प्रभाव पडला नाही" असे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केल्याने बंगळूरसह राज्यातील अनेक भागांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

Advertise 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !