MB NEWS:मराठवाडा शिक्षक संघाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

 मराठवाडा शिक्षक संघाचा गौरवशाली इतिहास टिकविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी दिपस्तंभा सारखे कार्यरत रहावे - पी.एस.घाडगे



मराठवाडा शिक्षक संघाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर 


 परळी / वार्ताहर 


 मराठवाडा शिक्षक संघाला गौरवशाली इतिहास आसून तो पुढे कायम चालू ठेवण्यासाठी व टिकवण्यासाठी शिक्षक संघाच्या नुतन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिपस्तंभा सारखे सतत कार्यरत रहावे असे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक पी.एस.घाडगे यांनी केले.

   मराठवाडा शिक्षक संघाचे दोन दिवसीय कार्यकर्ता उदबोधन प्रशिक्षण शिबिर बीड जवळील कपीलधार येथे नुकतेच संपन्न झाले. यावेळी उपस्थित शिक्षक संघाच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांना *मराठवाडा शिक्षक संघाचा इतिहास* या विषयावर मार्गदर्शन करताना घाडगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यकर्ता शिबीराचे उद्घाटक तथा दैनिक प्रजापत्रचे संपादक सुनील क्षीरसागर, संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम आदीजन उपस्थित होते. यावेळी घाडगे यांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या स्थापनेपासून (२९ जानेवारी १९६७) ते आतापर्यंत संघटनेने केलेल्या विविध कार्याचा व अंदोलनाचा लेखाजोखा शिबिरातील उपस्थित संघटनेच्या पदाधिकारी व शिक्षक कार्यकर्त्या समोर मांडला.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार कदम यांनी केले तर  सुत्रसंचालन गणेश आजबे यांनी केले व आभार कालीदास धपाटे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !