इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल पकडला; संभाजीनगर पोलिसांची कारवाई

 जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल पकडला; संभाजीनगर पोलिसांची कारवाई

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
   जिवंत काडतुसासह एका जणास गावठी पिस्तुलसह पकडण्यात संभाजीनगर पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
      याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार दि. 05/05/2023 रोजी 11.00 वा. राहते घरी फुलेनगर परळी वै.येथे आरोपी अजय गौतम साळवे वय 24 वर्ष रा. फुलेनगर परळी वै याच्याकडून गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) व एक जीवंत काडतुससह तसेच दोन लाकडी मुठ असलेल्या लोखडी कत्त्या (किमंत अंदाजे 17,000 रु.) असा ऐवज  मिळून आला.याप्रकरणी पोना विष्णु बाजीराव सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरन-81/2023 कलम  3, 4, 25 भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सफा भताने हे करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या