MB NEWS:उष्णतेचा कहर : मोठ्याप्रमाणावर साप निघण्याचे प्रमाण वाढले : सर्पमित्रांकडून चांगली कामगिरी

 उष्णतेचा कहर : मोठ्या  प्रमाणावर साप निघण्याचे प्रमाण वाढले : सर्पमित्रांकडून चांगली कामगिरी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
     गेल्या काही दिवसांपासून आवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे.त्यामुळे वातावरण प्रचंड गरमीचे बनले आहे.जीवाची लाही लाही करुन टाकणारी गरमी व उष्णतेचा कहर यामुळे मोठ्याप्रमाणावर साप निघण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येतआहे. अशा परिस्थितीत परळीतील सर्पमित्रांकडून चांगली कामगिरी होत आहे.

       असाच एक प्रकार परळी शहरातील नवगण महाविद्यालय परिसरातील सरदार नगर मध्ये डाॅ.शेख यांच्या घरात लांबलचक साप निघाला.एवढा मोठा साप पाहून शेख कुटुंबिय गोंधळून गेले.शेजारीच राहणारे सामाजिक कार्यकर्ते मजास इनामदार यांनी तात्काळ त्यांचे मित्र असलेल्या सर्पमित्र लक्ष्मन गंभीरे रा.हमालवाडी यांना संपर्क केला.त्यानंतर सर्पमित्र लक्ष्मन गंभीरे यांनी या सापाला पकडून मेरुगिरी परिसरातील वनक्षेत्रात सुरक्षित सोडून दिले.नागरिकांनी साप निघाल्यावर न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा व वन्यजीवांचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात येत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !