MB NEWS:नौकरीची संधी :- पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा कोटयातील रिक्त पदे : अर्ज प्रक्रिया झाली सुरु

 नौकरीची संधी :- पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा कोटयातील रिक्त पदे : अर्ज प्रक्रिया झाली सुरु



स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्याबाबत भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील निम्न नमुद सरळसेवेची पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता दिनांक 26.05.2023 रोजी वर्तमानपत्रामध्ये जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची मुदत दिनांक 27.05.2023 रोजी सकाळी 10.00 पासुन सुरु होणार असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतीम दिनांक 11.06.2023 रात्री 11.59 पर्यंत आहे. 

 

1. पशुधन पर्यवेक्षक - 376 पदे

2. वरिष्ठ लिपीक- 44 पदे

3. लघुलेखक (उच्चश्रेणी)- 02

4. लघुलेखक (निम्नश्रेणी) -13

5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 04

6. विविध संवर्ग पदे- 07 (तारतंत्री-3, यांत्रिकी-2 व बाष्पक परिचर-2)


ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा /https://ibpsonline.ibps.in/cahmay23/ या संकेतस्थळावर तसेच सदर जाहिरात पशुसंवर्धन विभागाच्या https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 

अमागास प्रवर्गाकरिता  :- रु. 1000/- तसेच  मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक :- रु. 900/- इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. 

सदर जाहीरातीनुसार साधारणत: माहे जुलै 2023 या महिन्यामध्ये परिक्षा घेण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार