MB NEWS:सुसंस्कारामुळे माणुसकी वाढीला लागते - संस्कार शिबिराच्या समारोपात आचार्य हरिसिंहांचे प्रतिपादन

सुसंस्कारामुळे माणुसकी वाढीला लागते- संस्कार शिबिराच्या समारोपात आचार्य हरिसिंहांचे प्रतिपादन. ‌ ‌ 

       परळी वैजनाथ दि. १८- ‌ ‌ ‌ 

                 सध्याच्या भौतिक युगात भोगप्रधान संस्कृती उदयास येत असून माणुसकी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत संस्कार शिबिरांच्या माध्यमाने विद्यार्थ्यांच्या बालमनांवर केले जाणारे सुसंस्कार हे व्यक्ती, समाज व राष्ट्र निर्मितीसाठी मोलाचे ठरतात व त्यांद्वारेच माणुसकी वाढीला लागते, असे विचार दिल्ली येथील राष्ट्रीय व्यायाम प्रशिक्षक आचार्य हरिसिंह यांनी व्यक्त केले. ‌ ‌ 

            गेल्या सात दिवसापासून महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व येथील आर्य समाजाच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात सुरू असलेल्या मानवता संस्कार शिबिराची सांगता नुकतीच झाली. या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री आचार्य बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तपस्वी साधक स्वामी सोममुनीजी होते. तर व्यासपीठावर नितेश आर्य, लक्ष्मणराव आर्य गुरुजी, जयपाल लाहोटी ,आचार्य सत्येंद्र ,प्रशांतकुमार शास्त्री, विज्ञान मुनीजी, पं. प्रताप सिंह चौहान व इतरांची उपस्थिती होती. 

                   यावेळी उपस्थित मान्यवरांनी बदलत्या युगात मानवतेच्या संवर्धनासाठी संस्कार शिबिराच्या आयोजनावर भर दिला. सध्या लहान मुले व युवकांवर मोबाईलसारख्या समाज माध्यमाचा अनिष्ट परिणाम होत असल्याने नव्या पिढीत नानाविध दोषांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कुटुंब व शिक्षणव्यवस्था यादेखील अशा अनिष्ट व्यक्तींना रोखण्यास असमर्थ ठरत असल्याने संस्कार शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे ठरते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तर विद्यार्थ्यांनी विविध व्यायामाचे प्रकार सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या निवासी शिबिरात मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या जवळपास पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास साधत सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्याचा बोध घेतला. 

                 शिबिरादरम्यान सर्वश्री उग्रसेन राठौर, लोणावळा येथील आचार्य श्री वीरेंद्रजी, योगीराज भारती , डॉ.नयनकुमार आचार्य, डॉ. वीरेंद्र शास्त्री , डॉ. अरुण चव्हाण, प्रा. डॉ. जगदीश कावरे, लक्ष्मण आर्य गुरुजी, आचार्य अविनाश, नितेश आर्य, भागवतराव आघाव, आचार्य सत्येंद्र, विज्ञानमुनी, संतोष उपाध्याय, रंगनाथ तिवारी आदींनी विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री लक्ष्मण आर्य गुरुजी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुण चव्हाण तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. वीरेंद्र शास्त्री यांनी केले. शिबिर व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्य समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !