MB NEWS: "श्री शिवराज्याभिषेक-हिंदू साम्राज्य दिन" :मराठवाड्यातील रायगड प्रतिकृती असणारे पहिले शिवस्मारक इसाद येथे विविध कार्यक्रम

"श्री शिवराज्याभिषेक-हिंदू साम्राज्य दिन" : मराठवाड्यातील रायगड प्रतिकृती असणारे पहिले शिवस्मारक इसाद येथे विविध कार्यक्रम 



गंगाखेड....

       रायगड प्रतिकृती असणारे मराठवाड्यातील पहिले शिवस्मारक शिवस्मारक छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, इसाद ता.गंगाखेड जि.परभणी येथे मिती ज्येष्ठ शु.१३ शके १९४५, शुक्रवार. शिवशक ३५०. दि.२ जून २०२३ रोजी सकाळी ठीक ८:०० वा. पासून "श्री शिवराज्याभिषेक-हिंदू साम्राज्य दिन" सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या भव्य-दिव्य उत्सवास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक आर.डी.भोसले इसादकर यांनी केले आहे.

            या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भुषणसिंहराजे होळकर, नरवीर शिवरत्न शिवबा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशाची डॉ.शितलताई मालुसरे, प.पू.महामंडलेश्वर सुरेंद्र गिरी महाराज, जैन मुनि निलेशचंद्रजी महाराज, अ.भा.छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष भाऊ मुरकुटे आदी सर्व विशेष उपस्थित राहणार आहेत. तसेच कांतराव देशमुख, डॉ.संजय कच्छवे, डॉ.सुभाष कदम, रामप्रभू मुंडे, धनराज गवळी, पंजाबराव काळे, मंजुषा दर्डा, विठ्ठलराव रबदडे,  आकाश जामगे, विजयकुमार घाडगे, बाळासाहेब राखे, रंगराव सुपेकर, गोविंदराव मुळे, सखाराम बोबडे, बालासाहेब पारवे, अशोक भिसे, तुकाराम कदम साहेब, क्षितिज चौधरी, स्वप्निल राठोड, गजानन पांचाळ, अजय रेड्डी, सूर्यासिंह राजपूत, रामप्रसाद टेकाळे, किशनराव भोसले, उद्धवराव सातपुते, राजाभाऊ सातपुते, अशोकराव भोसले, रामप्रसाद सातपुते, विश्वनाथराव सातपुते, आप्पासाहेब भोसले आदी सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

            या शिवस्मारकाचे लोकार्पण २५ फेब्रुवारी २०२० रोजी संपन्न झाले आहे. या शिवस्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यापासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची नित्य पूजा, साप्ताहिक शिववंदना, नवं वधू-वरांच्या भेटी, वाढदिवसानिमित्त पूजन, या शिवाय हिंदवी स्वराज्यातील थोर मावळ्यांच्या जयंती-पुण्यतिथी, अनेक महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी आदी सर्व उपक्रम सातत्याने सुरू असतात. या ठिकाणी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी आवर्जून भेटी दिल्या आहेत.

            तरी परिसरातील तमाम नागरिकांनी या सोहळ्यासाठी आजच आपला वेळ राखीव ठेऊन आवर्जून उपस्थित राहण्याची आग्रहाची विनंती मुख्य संयोजक आर.डी.भोसले इसादकर व समस्त गावकरी मंडळी इसाद यांच्या वतीने आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार