राहुल गांधींच्या नेतृत्वापुढे कर्नाटकात मोदी-शहांचा करिष्मा पडला फिका - ॲड.माधव जाधव
भाजपची मुस्कटदाबी आता देश सहन करणार नाही
परळी/प्रतिनिधी दि.१३- भाजप कडून होत असलेली सर्वसामान्य जनतेची मुस्कटदाबी आता देशात सहन केली जाणार नाही.राहुल गांधींच्या नेतृत्वापुढे मोदी-शहांचा करिश्माही फिका पडला असून भारत जोडो यात्रेमुळे कर्नाटकात काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे असे प्रतिपादन किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकितही देशात काँग्रेसची सत्ता येईल असेही ते म्हणाले आहेत.
दिवसेंदिवस वाढत जात असलेली महागाई आता सर्वसामान्य नागरिकाला आता नको आहे. देशात लोकशाही असलेलेली अवस्था पाहुन आता मतदारच उत्तर देत आहेत.कर्नाटकापासून बदलाला सुरुवात झाली आहे.जाती - धर्मामध्ये तेढ निर्माण करून भाजपाने अनेक ठिकाणी सत्ता मिळवली. काही ठिकाणी सरकारी यंत्रणांचा वापर सत्तेसाठी करण्यात आला.मात्र आता मतदारांनीच भाजपला नाकारले असून राहुल गांधींचे नेतृत्वच देशाला पुढे घेऊन जाईल.कर्नाटकाच्या मतदारांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे असे ॲड.माधव आप्पा जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा