इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:शिक्षणाला समाजकारणाची जोड हवी - नवनाथ दाणे

 शिक्षणाला समाजकारणाची जोड हवी - नवनाथ दाणे




परळी वै.येथील शिवछत्रपती विद्यालय येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एकव्या

स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय समुद्रे यांनी डाँ बाबासाहेब  आंबेडकर यांच्या  शिक्षणासाठी मोठे योगदान महाराज यांच्या सामाजिक  कायाबदल माहीती दिली आहे .तसेच शाळेतील ,तर

प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे,पत्रकार धीरज जंगले,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी उफाडे हे

उपस्थित होते.

                कार्यक्रमाची सुरूवात 

प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश्वर इंगोले यांनी केले.प्रमुख मार्गदर्शन करताना नवनाथ दाणे यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला.आरक्षण नावाची संकल्पना पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराज  

यांनी मांडली आणि त्याची अंमलबजावणी आपल्या संस्थानात केली.,स्वस्त धान्य दुकानाची सुरूवात,वस्तीगृहे,कुस्ती आखाडे यांची स्थापना ..जातीपातीला विरोध करून समता प्रस्थापित करण्यासाठी भरघोस कार्य महाराजांनी केले आहे.त्यांच्या विचारांचे वारसदार होऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर समाजकारण 

करायला शिकलं पाहिजे असे विचार आपल्या भाषणातून दाणे यांनी मांडले.  शाळेचा माजी विद्यार्थी रामेश्वर काकडे यांनी शिकागो अमेरिकेतून फोनवर विद्यार्थ्यांना आपले विचार ऐकविले. अध्यक्षीय भाषणात मु.अ.समुद्रे यांनी माणसातील हिरे शोधून त्यांना पैलू पाडण्याचं कार्य केलं ..गोरगरिबांनी शिक्षण मिळावे म्हणून विविध योजना अंमलात आणल्या खऱ्या अर्थाने शाहू महाराज लोकराजा होते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धेश्वर इंगोले तर आभार प्रदर्शन गोरख नरारे यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक श्री.प्रकाश पाटील,नामदेव ठाकरे,रोहिदास शिंदे, हगारे,विजय खोकले,महादेव बडे,अनिल इंगोले,बापूराव खोतपाटील,अशोक फड,विष्णू तोडकर,अंकुश चव्हाण,सचिन कर्नर,संतोष मेंडके,विश्वास काळे,राजेंद्र कोकाटे,श्रीम.सुहासिनी घोबाळे,सचिन खरात,भाऊसाहेब सोळंके, श्रीम.चेपट, नाना रोडे,कोंडीबा ईबितवार,सिद्राम डाके इ..शिक्षक कर्मचारी ,विद्यार्थी  उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!