परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:लिट्ल फ्लॉवर कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम!

 लिट्ल फ्लॉवर कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम!



     मॉडर्न एज्युकेशन सोसायटी परळी (वैजनाथ) संचलित लिट्ल फ्लॉवर कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. एकुण महाविद्यालयाचा निकाल 95.32% लागला आहे.विज्ञान शाखा 100%,वाणिज्य शाखा 97.14%,कला शाखा85.18%,व्यावसायिक शाखा 90.90% निकाल लागला आहे.

       विज्ञान शाखेतून अनुक्रमे प्रथम जैस्वाल दुर्गेश ओमप्रकाश 79.50% द्वितीय इनामदार फजीलत मुद्दिसर  79.33%,तृतीय देशमुख विरोचन तानाजी 77.50% वाणिज्य शाखेतून अनुक्रमे प्रथम चाटे यशश्री भालचंद्र 90.17%, द्वितीय अष्टेकर सायली सुनील 84.50%, तृतीय काकाणी साक्षी विजय 81.33%,कला शाखेतून अनुक्रमे प्रथम फड साक्षी सिद्धेश्वर 74% द्वितीय सोळवे प्रियंका शनी 72.33% तृतीय शिंदे मेघा विश्वनाथ 61.67% व्यावसायिक शाखेतून अनुक्रमे प्रथम उंबारे किरण कल्याणराव 73.17%,द्वितीय भांड सोमनाथ गौतम 71.33%,तृतीय राठोड समाधान गणेश 70.50% उत्तीर्ण झाले आहेत.

     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव ,अध्यक्ष,प्राचार्य वीरेंद्र शास्त्री,प्रा.रामेश्वर सारडा,प्रा.साखरे सर,प्रा.मेंडके सर,प्रा.पंजाबराव येडे,प्रा.गरड सर,प्रा.संदेश सर,प्रा.समुदे सर,प्रा. भातांगळे सर,प्रा. शिंगणे मॅडम,प्रा.यादव मॅडम,प्रा.स्वामी मॅडम,प्रा.गोरे मॅडम,प्रा.तानाजी सर,प्रा.तोंडारे सर,प्रा.सातपुते सर,प्रा.गौरशेट्टे मॅडम,प्रा.गोरे सर,संजय सर, माने ,महेश जुनाळ, यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!