MB NEWS:आणखी भरीव मदत करण्याचे केले आवाहन

 वैद्यनाथ विद्यालयाच्या २००२ सालच्या १० वी  वर्गाचा वेदांत च्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात

आणखी भरीव मदत करण्याचे केले आवाहन



परळी वैजनाथ(प्रतिनिधी) दि.१६ - अलिकडच्या काळात शाळांमधे मागील वर्गाचे मेळावे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत. यासाठी वर्गणीही गोळा केली जाते मात्र यातून उरलेल्या रकमेचा समाजहितासाठी काहीतरी उपयोग व्हावा याचे उदाहरण समोर ठेवले आहे.वैद्यनाथ विद्यालयाच्या २००२ सालच्या १० वी वर्गाने ४७,५२४ रुपयांची मदत करण्यात आली असून या वर्गाकडून वेदांत ला आणखी मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


विल्सन डीसिज नावाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या वेदांत गणेश जोशी,परळी वैजनाथ या मुलास आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.यासाठी अनेक हात सरसावत आहेत, त्याचे लिव्हर प्रत्यार्पण केले जाणार असून यासाठी २५ लाख एवढी रक्कम लागणार आहे.वैद्यनाथ विद्यालयाच्या २००२ सालच्या १० वी वर्गाने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमातील मुदत ठेव ची संपूर्ण रक्कमच वेदांत च्या शस्त्रक्रियेसाठी दिली आहे. मदतीपोटी ४७,५२४ रुपयांच्या मदतीचा धनादेश जोशी कुटुंबीयांना सुपूर्द केला आहे.यावेळी वर्गमित्र विजय चव्हाण,प्रवीण तोताडे,गोविंद खपले,नागेश जोशी,भूषण अंबेकर,प्रदीप अग्निहोत्री पत्रकार अनंत कुलकर्णी,स्वानंद पाटील आदि उपस्थित होते.

Advertise 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !