परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
'जवाहर' च्या मतदान केंद्रास पंकजाताई मुंडे यांची भेट ; उमेदवार, मतदारांशी साधला संवाद
परळी वैजनाथ.....
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सकाळी वैद्यनाथ महाविद्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन उमेदवार व मतदारांशी संवाद साधला.
जवाहर शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाच्या निवडीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. सकाळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ महाविद्यालय येथे असलेल्या मतदान केंद्राला भेट दिली. तत्पूर्वी मतदान केंद्राबाहेर असलेल्या पॅनलच्या मंडपात जाऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्यासमवेत अल्पोपाहारही केला. पॅनलचे सर्व उमेदवार तसेच मतदारांशी यावेळी त्यांनी संवाद साधला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा