इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:वैद्यनाथाची कृपा अन् सर्वांची मदत व सदीच्छा: परळीच्या वेदांतचे लिव्हर प्रत्यारोपण यशस्वी; प्रकृती स्थिर

 वैद्यनाथाची कृपा अन् सर्वांची मदत व सदीच्छा: परळीच्या वेदांतचे लिव्हर प्रत्यारोपण यशस्वी; प्रकृती स्थिर



परळी वैजनाथ ,प्रतिनिधी
       परळी शहरातील रहिवाशी चि. वेदांत गणेश जोशी यांच्यावर दुर्धर अशा प्रकारची लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली होती. सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीच्या कुटुंबातील या चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च करण्यासाठी सर्व स्तरातून दाते पुढे आले व अशक्यप्रय असणाऱ्या खर्चाची तजवीज झाली. वेदांत वर लिव्हर प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून त्याची प्रकृती स्थिर झाली आहे. लवकरच   वेदांत ठणठणीत होईल अशी आनंदवार्ता डाॅक्टरांनी दिली आहे.
          वेदांत व त्याच्या आईचे (डोनर ) ऑपरेशन यशस्वीपणे पार पडले. शनिवारी रात्री १०.३० वाजता पूर्ण झाले. वेदांतला लिव्हरचे जॉइंट खूप चांगले बसले आहेत. दोघांचीही प्रकृती चांगली आहे. वेदांतची भूल ४८ तासांपर्यंत ठेवणार होते मात्र, प्रकृती चांगली असल्याने लवकरच उतरवली. साधारण पुढील एक आठवडा हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्रभु वैद्यनाथ कृपेने, सर्वांच्या आशीर्वादाने व मदतीने ऑपरेशन यशस्वीपणे पार पडली असून कुटुंबियांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!