MB NEWS:वादानंतर शिवसेनेचा तकफडकी निर्णय

 संपर्कप्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवची हकालपट्टी



वादानंतर शिवसेनेचा तकफडकी निर्णय

बीड- शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना दोन चापटा मारल्याचा दावा करणारे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांचे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बीड येथे झालेल्या राड्यानंतर पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ही तडकाफडकी कारवाई केली. 


उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने राज्यभर काढण्यात असलेल्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीड येथे शनिवारी (दी.20) होत आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून गुरुवारी सायंकाळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे व स्थानिक नेते सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी छोट्याशा कारणावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात वास झाला. दरम्यान यावेळी उपनेते सुषमा अंधारे यांनाही धक्काबुक्की झाल्याचे समजते. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी आप्पा जाधव यांची गाडीही फोडली. शिवसैनिकांचा राग अनावर झाल्याचे पाहून आप्पासाहेब जाधव यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान काही वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देताना आप्पा जाधव यांनी आपण उपनेत्या सुषमा अंधारे यांना दोन चापट मारल्या मारल्याचे तसेच त्या पैसे साहित्य मागत असल्याचा आरोप केला होता. या सर्व राड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून तडका फडकी हाकालपट्टी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार