MB NEWS:कर्करोग पूर्व निदान शिबीर व व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 कर्करोग पूर्व निदान शिबीर व व्याख्यानाला  उत्स्फूर्त प्रतिसाद 



छत्रपती संभाजीनगर (-संजय क्षिरसागर)- जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या वडोदचाथा येथे कर्करोग ह्या आजाराविषयी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान व

कर्करोग पूर्व निदान शिबिर नुकतेच संपन्न झाले.

                                   महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तन कर्करोग व थायरॉईड या आजारांविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने दि. १९ मे रोजी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

        याप्रसंगी कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी कर्करोग प्रतिबंधाबाबत विशेष मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ. कैलास चिंतले (सहा. प्राध्यापक मेडिसिन अंकोलॉजी ) डॉ. ओंकार (सर्जिकल ऑनकॉलॉजी) डॉ.स्फूर्ती (सहा. प्राध्यापक जीव रसायनशास्त्र ) व डॉ. सोमेश्वर गुंठे यांनी उपस्थित लोकांची तपासणी करुन त्यांच्या शंकांचे निरसन केले‌.

      शिबिरासाठी वडोदचाथा तालुका सिल्लोड येथील 

सामाजिक कार्यकर्ते श्री काकासाहेब चाथे  व गेब्स फाउंडेशन चे श्री.गणेश मते यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी श्री बालाजी देशमुख, श्री इंदल जाधव,श्री मुदसर सय्यद व श्री प्रवीण गाडे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार