MB NEWS:कोविड योद्ध्यांचा व समाजसेवकांचा होणार सन्मान, आ.धनंजय मुंडेंची प्रमुख उपस्थिती

 सहकारमहर्षी रामकृष्ण बांगर यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त पाटोद्यात प्रथमच जंगी कार्यक्रमाचे आयोजन

कोविड योद्ध्यांचा व समाजसेवकांचा होणार सन्मान, आ.धनंजय मुंडेंची प्रमुख उपस्थिती


सिने अभिनेते सुनील शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गायिका अभिलिप्सा पांडा पथमच येणार पाटोद्यात


अभिनेत्री मानसी नाईक, स्मिता गोंदकर, रुपाली भोसले, दर्शन साटम व कविता राम यांच्या सुमधुर आवाजात रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम


माझा देव उत्सव समितीचे आयोजन व तर थेट परळीहून वाल्मिक कराड यांचे नियोजन!


पाटोदा (दि. 26) - पाटोदा तालुक्यातील सहकार महर्षी व शिक्षण सम्राट अशी दुहेरी ओळख असलेले ज्येष्ठ नेते रामकृष्ण बांगर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त माझा देव उत्सव समिती यांच्या वतीने पाटोदा येथे प्रथमच भव्य दिव्य अशा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे शनिवारी (ता.27) पाटोदा येथे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. 27 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून चाऊस मैदान, मांजरसुम्भा रोड, पाटोदा येथे संपन्न होणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमात रामकृष्ण बांगर यांच्या अभिष्टचिंतनासह पाटोदा तालुक्यामध्ये कोविडच्या काळात आपले प्राण पणाला लावून सेवा कार्य केलेल्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये डॉक्टर एल.आर. तांदळे, डॉक्टर प्रगती बिनवडे यांच्यासह अन्य कोविड योद्ध्यांचा सन्मान तसेच सामाजिक क्षेत्रात ऋषितुल्य कामगिरी करणारे इन्फंट इंडिया चे संचालक दत्ताभाऊ बारगजे व शांतीवन चे संचालक दीपक काका नागरगोजे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटोदा शहरात प्रथमच सुप्रसिद्ध सिने अभिनेते सुनील शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तसेच 'हर हर शंभू' या गाण्याद्वारे सबंध देशाला परिचित झालेली पार्श्वगायिका अभिलिप्सा पांडा हे सर्वजण प्रथमच पाटोदा नगरीत येणार आहेत; त्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.


अभिष्टचिंतन सोहळ्यात आणखी रंगत आणण्यासाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत रजनीचेही प्रथमच आयोजन करण्यात आले असून, मराठी सिनेअभिनेत्री मानसी नाईक, स्मिता गोंदकर, रुपाली भोसले, गायक दर्शन साटम व कविता राम यांच्या सुमधुर आवाजात रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. 


या अभिष्टचिंतन सोहळ्यास आ.धनंजय मुंडे यांच्या सह आष्टी-पाटोदा-शिरूरचे आमदार बाळासाहेब आजबे, आ.सुरेश धस, मा.आ.भीमराव धोंडे, मा.आ.साहेबराव दरेकर, रा.यु.कॉ.चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, पाटोदा नगरीचे नगराध्यक्ष सय्यद अब्दूल्ला, जुबेर चाऊस यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


आयोजन पाटोद्यातून तर नियोजन थेट परळीहून


दरम्यान या कार्यक्रमाचे अयोजन माझा देव उत्सव समिती बीड जिल्हा यांच्या मार्फत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह (बाळा बांगर) व सहकाऱ्यांनी केले असून, या आयोजनाचे नियोजन मात्र थेट परळीहून ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वाल्मिक अण्णा कराड यांच्या नियोजनात अनेक मोठमोठे राजकीय व अराजकीय कार्यक्रम रेकॉर्डब्रेक गर्दीसह यशस्वी झाल्याचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे या अभिष्टचिंतन सोहळ्यास देखील रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार यात शंका नाही!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !