MB NEWS:मतभेद विसरून गावाला समृद्ध करा-पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

पर्यावरण संतुलन, स्वच्छता, लोकसहभाग व गावाच्या गरजा या सुत्रातून  गाव समृद्ध होईल – भास्करराव पेरे पाटील

मतभेद विसरून गावाला समृद्ध करा-पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने


परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... पर्यावरण संतुलन, स्वच्छता, लोकसहभाग व गावाच्या गरजा या सुत्रातून  गाव समृद्ध होईल.एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य आहेअसे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील आदर्श गाव पाटोदा येथील माजी सरपंच व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी टोकवाडी येथे केले.

    

       परळी तालुक्यातील विकासात्मक कामात अग्रेसर ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या  टोकवाडी ग्रामपंचायतच्या वतीने  रविवार दि.०७.०५.२०२३ रोजी सायं. ०५.३० वा. टोकवाडी येथे रविवारी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास जगतविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.परळी-वै गटविकास अधिकारी संजय केंद्रे,ग्रा.पं. रुई ता. गेवराई (रेशीम उद्योग गाव) सरपंच कालिदास नवले,पं. स. परळी वै.सभापती बालाजी (पिंटू) मुंडे , ग्रा.पं. आवरगाव ता.धारुर (स्मार्ट व्हिलेज) सरपंच अमोल जगताप,ग्रा.पं. मस्साजोग ता. केज (स्मार्ट व्हिलेज)सरपंच संतोष  देशमुख , आदर्श ग्रामसेवक, बीड सखाराम काशीद आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत टोकवाडी यांच्यावतीने जि.प.प्रा. शाळा सांस्कृतिक सभागृह, अंगणवाडी क्र. २, शादीखाना, देवी मंदिर सभागृह क्र. १ व २, गावअंतर्गत इंटरनेट सुविधा आदी विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.

          पेरे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, सरपंच आणि ग्रामसेवकाने ठरवले तरच समृद्ध गाव होऊ शकते. गाव समृद्ध करण्यापूर्वी सर्वांनी स्वतःला समृद्ध करावे. त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य समृद्ध आपोआप होते. गावाच्या विकासासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. महिला सरपंचांना मोकळ्या मनाने काम करू देणे आवश्यक आहे. सरपंचांनी प्रत्येक नागरिकाला केंद्रबिंदू मानून काम करावे. गावातल्या गावात युवकांनी संघटित व्हावे, गावातच व्यावसाय सुरू करावा, जेणे करून पैसा गावांतच राहिला पाहिजे.सर्वांना सोबत घेऊन काम केले, तरच गाव समृद्ध होईल असे आवाहन  भास्करराव पेरे-पाटील यांनी केले.

         पाटोदा गावांत ४ प्रकारचे पाणी, मोठ्या प्रमाणात केलेले वृक्षारोपण, स्मशानभूमी, सायकल वाटप, सौरऊर्जा प्रकल्प, गांव भोजन, १०० टक्के वैयक्तिक स्वच्छतागृह अभियान, थुंकण्यासाठी केलेले वॉश बेसीन्स, कचऱ्याचे नियोजन, सीसीटीव्ही यंत्रणा, बायोमेट्रिक हजेरी, डिजीटल शाळा , पाण्याचे सर्व प्रकारचे नियोजन, सामुदायिक विवाह, वैयक्तिक वाढदिवस साजरा करणे, तंटामुक्त गांव, कपडे धुण्यासाठी धोबी घाट, निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार विजेते गांव असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आलेले आहेत याचे मुख्य कारण 'सूत्र' आहे, असे पेरे पाटील म्हणाले.

         यावेळी बोलताना जगतविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की,आजच्या काळात पद, पैसा, बुद्धीला किंमत नाही, तर तुम्ही तुमच्या सोबत किती जणाला घेऊन काम करता, याला किंमत आहे. अनेकता मे एकता असली की अनेक असाध्य विकासकामे सिद्धीस जातात. त्यामुळे मतभेद विसरून गावाला समृद्ध करा असे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रा. पं. सदस्य डॉ. राजाराम  मुंडे यांनी केले. सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन शाम आघाव सर यांनी केले.कार्यक्रमास परळी तालुक्यातील विविध गावचे सरपंच, कार्यकर्ते,गावकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी टोकवाडी सरपंच सौ.गोदावरीताई डॉ. राजाराम मुंडे, टोकवाडी उपसरपंच अनिल मुंजाजी काळे, ग्रामसेविका सौ. सुनिता गणपतराव रांजणकर, ग्रा. पं. सदस्य डॉ. राजाराम लक्ष्मण मुंडे, सौ. प्रमिला तुकाराम पारधे, सौ. कल्पना बालाजी मुंडे,सौ. प्रियंका संतोष पारधे, श्री नागनाथ पंढरीनाथ काळे, सौ. सुनिता बाजीराव रोडे,सौ. मनिषा तुकाराम मुंडे,  प्रदिप धोंडीराम रोडे, सौ.स्वाती अंगद काळे,सौ. आशा माणिक मुंडे, सौ. अलका नामदेव मुंडे,आजम हामजा शेख आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !