परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS: ‘महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे अवाहन

 ‘महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक  प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे अवाहन

        बीड, दि.27 (जिमाका):- सन 2023-24 मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके या बाबीसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महा डीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिकेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क करून नोंदणी करण्यासाठी ‘महाडीबीटी’- शेतकरी योजना पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. राष्ट्रीय अन्नसुरक्षा-अभियान अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खादयतेल अभियान गळीतधान्य कार्यक्रम खालील नमूद पिकासाठी जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.


कडधान्य:-


तुर,मुग,उडीद (100 टक्के अनुदान)


पौष्टिक तृणधान्य:-


खरीप ज्वारी, बाजरी (100 टक्के अनुदान)


गळीत धान्य:-


सोयाबीन (अनुदान रुपये 45 प्रति किलो बियाणे साठी)


प्रमाणित बियाणे वितरण:-


एकूण किमतीच्या 50 टक्के मर्यादित अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे.असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!