इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:सिरसाळा येथे श्री पांडुरंग रुक्मिणी व प.पु.सद्गुरु ब्रह्मिभुत वामनानंद महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

 सिरसाळा येथे श्री पांडुरंग रुक्मिणी व प.पु.सद्गुरु ब्रह्मिभुत वामनानंद महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... .
       प. पू. श्री गुरुवर्य माधवानंद महाराज मठाधिपती, चिन्मय मुर्ती संस्थान, उमरखेड यांच्या कृपाआशिर्वादाने प.पू. ब्रह्मिभूत वामनानंद महाराज यांच्या जन्मस्थळी सिरसाळा ता. परळी वै. येथे शनिवार दि. १३/५/२०२३ ते मंगळवार दि. १६/५/२०२३ या कालावधीत श्री पांडुरंग रुक्मिणी व प.पु.सद्गुरु ब्रह्मिभुत वामनानंद महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

        वैशाख कृ. ९ शके १९४५ शनिवार दि. १३/५/२०२३ रोजीसुरुवात पुण्यावाचन नांदीश्राद्धादी कर्म, वैशाख कृ. १० शके १९४५ रविवार दि. १४/५/२०२३देवस्थापणा, अग्नीस्थापना व सर्व देवता उपचार करणे,वैशाख कृ. ११ शके १९४५सोमवार दि. १५/५/२०२३दशविधी स्नान व प्राणप्रतिष्ठा करणे, वैशाख कृ. १२ शके १९४५ मंगळवार दि. १६/५/२०२३सकाळी ७ ते ९ - अभिषेक, महापुजा, सकाळी ९.३० ते ११.३० वे.शा.सं.ह.भ.प. भागवताचार्य श्री अनिल महाराज जोशी माजलगाव यांचे किर्तन नंतर आरती व महाप्रसाद होईल.मुर्ती प्राणप्रतिष्ठा व महाप्रसाद यजमान श्री सुधाकर श्रीरामपंत टेकाळे, सिरसाळा हे आहेत.

      प.पू.सद्गुरु वामनानंद महाराज जन्मस्थळ, सिरसाळा ता. परळी वैजनाथ येथील या सोहळ्यास सर्व गुरुभक्तांनी महाप्रसादाला उपस्थित राहवे असे आवाहन सर्व गुरुभक्त मंडळी, सिरसाळा ता. परळी वैजनाथ. जि. बीड. यांनी केले आहे.

Advertise 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या