MB NEWS:महाराष्ट्र वीरशैव सभेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी दत्ताप्पा ईटके गुरुजी यांची फेरनिवड

 महाराष्ट्र वीरशैव सभेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी  दत्ताप्पा  ईटके गुरुजी यांची फेरनिवड 



परळी: महाराष्ट्र वीरशैव सभा, पुणे या संस्थेच्या बीड जिल्ह्य़ातील मान्यता प्राप्त सदस्याची बैठक संत गुरू लिंग स्वामी मंदिरात संपन्न झाली. बैठकीत विविध उपक्रमाबाबत चर्चा झाली. महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा कार्यकारिणीची निवड पुढील तीन वर्षासाठी करण्यात आली. जिल्हा अध्यक्षपदी श्री. दत्ताप्पा ईटके यांची फेरनिवड करण्यात आली, कार्याध्यक्षपदी संजय घाळे   (बीड)उपाध्यक्ष पदी चंद्रकांत अप्पा  थळकरी (यूसुफ वडगाव) सरचिटणीस पदी सुधीर फुलारी  ,कोषाध्यक्ष पदी प्रभाकरअप्पा शेटे, सहचिटणीस पदी  शाम बुद्रे ,युवा अध्यक्ष पदी अनंत शहागडकर बीड तर महिला अध्यक्षा म्हणून नगरसेविका सौ. उमाताई समशेटे यांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीवर अशोक शहागडकर, अश्रूबा कोरसाळे  ,नंदकिशोर विभुते, शिवकुमार केदारी, महादेव फडकरी, चंद्रकांत समशेटे ,विकास हालगे ,दत्ता गोपनपाळे ,अशोक नावंदे ,रंगनाथ खके ,जी. येस. सौंदळे गुरुजी,वैजनाथ  इटके ,सोमनाथ गोपनपाळे यांची निवड करण्यात आली.  या बैठकीला प्रांतिक सदस्य श्री अमरनाथ खूर्पे ,रमेश पाटील, शिवशंकर भुरे व बीड माजलंगाव ,केज,परळी येथील मान्यवर सदस्य उपस्थित होते, दत्ताप्पा  ईटके गुरुजी यांनी प्रास्ताविक केले तर सुधीर फुलारी यांनी संचलन केले. यावेळी संपादक आत्मलिंग शेटे सो सुचिता पोखरकर, महादेव ईटके माजी नगरसेवक रमेश चौडे नितीन समशेट्टी अश्विन मोगरकर सुशील हरंगुळे मंगेश स्वामी मनोज चौंडे योगेश स्वामी अमोल बुरकुल यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यां चा  सत्कार यांनी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार