MB NEWS:मदतीचे आवाहन

 मदतीचे आवाहन



परळी येथील वेदशास्त्र संपन्न पंडित कै. नारायणराव जोशी यांचा  सहा वर्षांचा पणतू  ऍक्युट लिव्हर फेल्युअर (विल्सन डिसीज) या दुर्धर आजाराने आजारी आहे. त्याला पुण्यातील  ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. डॉक्टरांनी या आजारावर लिव्हर ट्रान्सप्लांट ची शस्त्रक्रिया सांगितली असून, यासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च येणार आहे. जोशी कुटुंब हे गरीब परिस्थितीतील असल्यामुळे ही रक्कम उभी करणे त्यांना अतिशय कठीण आहे. आपणा सर्वांना विनंती की, आपण उदार अंतःकरणाने शक्य तेवढी आर्थिक मदत करून या खर्चास हातभार लावावा. आपल्या मदतीतून एका छोट्या जीवाचे प्राण वाचणार आहेत. जीवन मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या या छोट्या मुलासाठी आपली मदत ही किती अमूल्य आहे याची गणना करता येणार नाही. पुढील लिंकवर मदत पाठवावी किंवा  संपर्क 




आजाराच्या "विल्सन" वादळात सापडलेला चिमुकला जीव!

वरिष्ठ बाल-शिशुरोग तज्ज्ञ डॉक्टर गुरुप्रसाद देशपांडे यांनी आज पहाटे साडेपाचच्या सुमारास पाठवलेला मॅजेस माझ्याकडून अंमळ उशिरानेच पाहण्यात आला. अस्वस्थ करून सोडणारा मॅसेज होता. दुसऱ्याच क्षणी फोन लावला. ते म्हणाले, " ५ मे रोजीच वेदांतला आपल्याकडे आणले होते. खूप चुणचुणीत मुलगा. सहा वर्षांचा. वेदान्तला *विल्सन डिजिज* या आजाराचे निदान झाले. शरीरात तयार होणारे तांबे (कॉपर) लिव्हर, मेंदू व डोळ्यांमध्ये उतरते. या आजाराला वेदान्तचे लिव्हर सापडले."

डॉक्टर पुढे सांगू लागले, "३० हजारांमधून एकाला होणाऱ्या या आजाराने जेमतेम परिस्थिती असलेल्या घरात जन्माला आलेल्या वेदान्तला गाठले.लिव्हर प्रत्यारोपणाशिवाय तरणोपाय नाही. त्यासाठी २५ लाखांचा खर्च आहे. त्याच्यासाठी मदतीचे हात पुढे आले तरच वेदान्तविषयी आशा राहील. एक सुदैव म्हणजे वेदान्तसाठी एक लिव्हर डोनर पुढे आला आहे. एक मोठा प्रश्न मिटलाय. आता पैशांची जुळवाजुळव तेवढी बाकी आहे. प्रत्यारोपणासाठी वेळ खूप कमी आहे." 

वेदान्तवर सध्या पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वेदान्तचे वडील गणेश जोशी - धरणीधर म्हणाले, "पैशांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. पण मी परळीत साधा अकाऊंटंट आहे. जेवढी गंगाजळी आहे, ती काढून अन्य प्रयत्नही करतो आहे. समाजातून पाठबळ मिळते आहे, हे आमचे मनोबल वाढवणारे आहे, पण उपचाराच्या रक्कमेचा आकडा मोठा आहे."
  - गणेश जोशी
9730065592




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार