MB NEWS:बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती

 समर्थ प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात २२ बटूंवर उपनयन संस्कार

बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती


◼️ धर्मशील व्यक्ती,समाज व राष्ट्र निर्मितीसाठी उपनयन संस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व - वे.शा.सं. ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी



परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२४ - वेदनिष्ठ धर्मशील व्यक्ती,समाज व राष्ट्र निर्मितीसाठी सोळा संस्कारांत उपनयन संस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.यासाठी केवळ खऱ्या अर्थाने उपनयन संस्कारानंतर अध्ययन,गायत्रीमंत्र पठण व अन्य संस्कारमूल्य जपले गेले पाहिजेत असे प्रतिपादन वे.शा.सं. ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांनी केले.धार्मिक,संस्कारित पिढी घडावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या समर्थ प्रतिष्ठान द्वारे  सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यासाठी बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज,वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.


गुरूवार दि.२५ रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनीटांच्या पावन मुहूर्तावर यंदाच्या सोहळ्यात २२ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले.श्री वैद्यनाथ दर्शन मंडपात या उपनयनाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थीती होती.या उपनयनाचे पौरोहित्य पं.विजय पाठक यांनी केले.संत महंतांची आशिर्वादपर उपस्थिती व शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उपनयन संस्कार सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांनी परिश्रम घेतले.


पुढे बोलतांना वे.शा.सं. ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांनी सांगितले की, धर्माचरणाचे संस्कार हे उपनयना सारख्या संस्कारातून होतात. त्यामुळे आपले सोळा संस्कार हे धर्मसंमत आहेत.अध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या या संस्कारांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते.देव,देश आणि धर्म पालनाचे संस्कार यातून रुजवले जातात. धार्मिकदृष्या तर अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे संस्कार सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे ठरतात.त्यामुळे केवळ व्रतबंध करुन सोपस्कार पार न पाडता उपनयन संस्कारानंतरचे आचरण व संस्कारमूल्य जपण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

◼️ संत महंतांसह मान्यवरांची उपस्थिती

दरम्यान या सोहळ्याला बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज, वे.शा.स.अनंत शास्त्री जोशी,वे.शा.स.सुरेश गुरू चोथवे सोनपेठ यांची प्रमुख उपस्थिती होती.यांच्यासह भा.शि.प्र.चे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य,भा.शि.प्र.चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड.रोहित सर्वज्ञ यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणचे समाजबांधव उपस्थित होते.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार