MB NEWS:सिलिंडर स्फोटात घर जळून खाक झालेल्या अकबर शेख अहमद यांना ॲड. माधव जाधव यांच्याकडून आर्थिक मदत

 सिलिंडर स्फोटात घर जळून खाक झालेल्या अकबर शेख अहमद यांना ॲड. माधव जाधव यांच्याकडून आर्थिक मदत





परळीदि.१२- बरकत नगर येथील अकबर शेख अहमद यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फ़ोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले होते.या स्फोटामध्ये एका १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.यामध्ये सहा जण गंभीर जखमीही झाले.तसेच अकबर शेख अहमद यांचे घर जळून खाक झाले.त्यांना भेटून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड.माधव आप्पा जाधव यांनी आर्थिक मदत देत आधार दिला.तसेच या स्फोटामध्ये जखमी झालेले शेख जुबेर महबूब व शेख आवाज मैनुद्दीन ह्या जखमींना सुद्धा जाधव यांच्याकडून धीर देण्यात आला. 


हा स्फोट इतका मोठा होता यामुळे बरकत नगर भाग हादरले होते.अंदाजे ३०० फुटापर्यंत या स्फोटा दरम्यान सिलेंडरच्या पत्र्याचे तुकडे गेले होते.या स्फोटाची माहिती मिळताच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव आप्पा जाधव यांनी प्रत्यक्ष भेटून आर्थिक मदत केली व जखमींना आधार दिला या प्रसंगी सेवकराम जाधव,संभाजी ब्रिगेड चे देवराव लुगडे महाराज, काँग्रेसचे नेते नरेश हालगे, ज्येष्ठ नेते जमील अध्यक्ष,एमआयएमचे युवा नेते मोहसीन भाई शेख यांच्यासह बरकत नगर भागातील शेख समिर, शेख जूबेर, शेख आपसर, शेख इलियास, शेख आजिम, सय्यद आजु, सय्यद अजगर, सय्यद अयमद, शेख अलिम, शेख रहात, शेख सरफराज, मनियार आरबाज यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार