MB NEWS: प्रा. डॉ .परमेश्वर गडकर यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर निवड

 प्रा. डॉ .परमेश्वर गडकर यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर निवड

अंबेजोगाई (प्रतिनीधी)...


   अंबेजोगाई तालुक्यातील राजेवाडी गावचे रहिवाशी असलेले व समाज शिक्षण मंडळ संचलित अमृतेश्वर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात व्यावसायिक अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभाग समन्वयक म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ . परमेश्वर गडकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर विद्यापीठ कुलगुरू नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली आहे. 


   प्रा. डॉ. परमेश्वर गडकर यांच्या निवडीमुळे अंबाजोगाई तालुक्यातील मौजे राजेवाडी नागरिकांत नवचैतन्य निर्माण झाले असून गावातील ग्रामस्थ व अमृतेश्वर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.  प्रा. डॉ . परमेश्वर संभाजी गडकर यांनी  ग्रामीण भागातील एका सामान्य मजुरी करनाऱ्या कुटुंबात जन्म घेऊन विद्येचे माहेघर असलेल्या पुणे येथील पुणे विद्यापीठामधून उच्च शिक्षण घेतले व उच्च शिक्षनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे . शिक्षण मंडळ संचलित अमृतेश्वर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २०१० पासून ते व्यावसायिक अर्थशास्त्राच्या  अध्यापनाचे  काम  करत आहेत. आजपर्यंच्या कारकिर्दीत त्यांनी विविध विषयांवर लेखन केलेले आहे. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील संशोधण जर्नल्समध्ये ४२ हुन अधिक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत ,विविध  संदर्भ ग्रंथ व समीक्षक  ग्रंथाचे लेखनही त्यांनी केलेले आहे.एक व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे  त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी त्यांची अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर निवड केली. गडकर सरांची निवड झाल्याबद्दल समाज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष्य प्रसिद्ध उद्योगपती  भाऊसाहेब पडवळ, कार्याध्यक्ष  . प्रदीप काका फडके, उपाध्यक्ष  संतोष अप्पा धसवडकर  व महाविद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य  डॉ. संजीव लाटे तसेच महाविद्यालतील गुणवत्ता सेलचे प्रमुख डॉ महादेव डोंगरे आणि सर्व प्राध्यापक यांनी सत्कार करून अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !