MB NEWS:मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद

 मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद





परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

          येथे श्री.शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त पक्षाघात जनजागृती, आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन रविवारी (ता.१४) येथील श्री.शनी मंदिरात करण्यात आले. यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

                   श्री.शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त पक्षाघात जनजागृती, आरोग्य शिबीरास लातूर येथील प्रसिध्द न्यूरो सर्जन व मेंदू विकार तज्ञ डॉ सुधीर चंद्रकांत फत्तेपुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे,डॉ संतोष मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, डॉ वैशाली गंजेवार, डॉ पांडुरंग फड, डॉ शिरीष आघाव, डॉ कुलदीप जैन, डॉ महेश बन, डॉ शेख मुस्ताकीम आदी उपस्थित होते. आरोग्य शिबीराच्या सुरुवातीला श्री.शनी देवाला पुष्पहार अर्पण करून आरोग्य शिबीरास सुरुवात करण्यात आली. श्री.शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने सर्व मान्यवर डॉक्टरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्य शिबीरात मोठ्या प्रमाणावर महिला, पुरुष सहभागी झाले होते. यावेळी डॉ फत्तेपुरकर यांनी नागरिकांना पक्षघात संदर्भात मार्गदर्शन केले, प्रोजेक्टरवर माहिती दिली. येथील आरोग्य विभागाच्या वतीने मोफत सीबीसी तपासणी करण्यात आली. तर स्वामी रामानंद तीर्थ रक्तपेढी व वैद्यनाथ रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले, यास महिला, युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ५१ युवक, महिलांनी रक्तदान केले. महिलांनीही रक्तदानासाठी प्रतिसाद दिला. स्वामी रामानंद तीर्थ रक्तपेढीच्या वतीने डॉ निखील जाधव, शशिकांत पारखे, शेख बाबा, सुनील सोळंके यांनी यासाठी सहकार्य केले. पक्षघात जनजागृती शिबीर, मोफत आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, श्री शनी भक्तांनी प्रयत्न केले. श्री.शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !