इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

 यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश



 

 परळी.वै (प्रतिनिधी)


नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या निकालात घवघवीत यश संपादन केले आहे.

 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या  मार्च 2023 परीक्षेचा निकाल  गुरुवारी जाहीर झाला असून  या निकालात  परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन.

महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 91.75 टक्के कला शाखेचा निकाल 80.48 टक्के वाणिज्य शाखेचा निकाल 75.00 टक्के इतका लागला आहे. या निकालात महाविद्यालयातुन विज्ञान शाखेतुन  

प्रथम ताटे मंगेश कांताराव -      77.66% ,

द्वितीय डोंगरे गायत्री भगवानराव - 76.83%,

तृतीय पाटसकर तनुजा व्यंकटेश -      75.66%

  कला शाखेतुन

 प्रथम किरडे वैभव कैलास -            77.00%,

द्वितीय तरटे बजरंग सूर्यकांत -        75.%,

तृतीय केंद्रे अनघा गोविंद-      73.33%,

     वाणिज्य शाखेतुन

प्रथम  केंद्रेआकांक्षा - 69.00%,

द्वितीय घोडके तेजश्री - 68.00%,

 तृतीय रोडे गुरु - 65.66%

महाविद्यालयातील यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.धंनजय मुंडे ,सहसचिव प्रदीप खाडे,महाविद्यालयाच्या  प्राचार्य  प्रा.अतुल दुबे यांच्या सह सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या