MB NEWS:मोटारसायकल व पीकअपचा अपघात: एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

मोटारसायकल व पीकअपचा अपघात: एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी    


 


केज :- केज कळंब रोडवर कमल पेट्रोल पंपाजवळ झालेल्या मोटार सायकल व पीक-अप अपघातातील एकाचा मृत्यू असून दोघे गंभीर जखमी आहेत. त्यातील एकावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दि १७ मे रोजी सायंकाळी ७:४५ वा. च्या सुमारास केज-कळंब रोडवर केज येथील कमल पेट्रोल पंपाच्या जवळच्या पुला जवळ एका मोटार सायकलीला क्र. (एम एच-४४/आर-७४४६) समोरून येणारे पिक-अप क्र. (एम एच-०४/ जे यु-०१३८) ने जोराची धडक दिली. त्या नंतर ते पिक-अप पुलाच्या लोखंडी कठड्याला धडकून खड्ड्यात जाऊन पलटी झाले. 

या अपघातात मोटार सायकली वरील आकाश हजारे, गौतम हजारे आणि विशाल सिरसट हे गंभीर जखमी झाले होते. त्या नंतर उपचारा दरम्यान आकाश हजारे याचा मृत्यू झाला. तर विशाल सिरसट याच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गौतम हजारे याच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार