MB NEWS:तीन हजाराची लाच मागितली व ती स्वीकारण्याची पंचासमक्ष कबुली दिली; एसीबीची कारवाई

 तीन हजाराची लाच मागितली व ती स्वीकारण्याची  पंचासमक्ष  कबुली दिली; एसीबीची कारवाई

परळी वैजनाथ दि २६:- शेतकरी सिंचन विहीर फाईल मधील ना हरकत वर सही करण्यासाठी शेतकऱ्यास तीन हजाराची लाच मागितली व ती स्वीकारण्याची कबूल केल्याबद्दल महावितरण उपविभाग परळी येथील कनिष्ठ अभियंता किरण निंबाळकर यांच्यासह एक खाजगी व्यक्ती अशा दोघाविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचे वडिलांचे व साक्षीदारांचे भाऊ यांचे नावे असलेल्या शेतामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत अल्प भुधारक शेतकरी सिंचन विहीरीचे फाईल मधील ना हरकत प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी आरोपी किरण जयवंत निंबाळकर कनिष्ठ अभियंता महावितरण उपविभाग परळी, राहणार बँक कॉलनी परळी व शहाणीक दत्तात्रयअनुसे राहणार रेवली तालुका परळी लोकसेवक यांनी पंचासमक्ष खाजगी इसमाचे मार्फतीने लाचेची मागणी करून लाच रक्कम खाजगी इसम याचे मार्फतीने स्वीकारण्याचे मान्य केले व खाजगी इसम यांनी ३००० रु ची मागणी करून तडजोडी अंती फाईलवर सही घेऊन देण्यासाठी स्वतःसाठी २०० रु व लोकसेवकासाठी ५०० रू असे तीन फाईलचे प्रत्येकी ७०० रू प्रमाणे २१०० रू स्विकारण्याचे मान्य केले व ते सिध्द झाले म्हणुन परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार