MB NEWS:आई - बापाचे छत्र हरवलेले : यशोगाथा- सख्खे भाऊ एकाचवेळी पोलीस दलात

 यशोगाथा- सख्ख्या तीन भावांची एकाचवेळी पोलीस दलात निवड 



परभणी : मातृ-पितृ छत्र हरवल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत मोठया भावाच्या खंबीर साथीने तिन्ही सख्ख्या भावंडानी संघर्ष करीत शिकत राहिली. त्यांच्या या संघर्षाने यशाला गवसनी घालत एकाचवेळी पोलिस दलाच्या सेवेत प्रवेश मिळविला आहे. त्यांच्या या संघर्षमय वाटचालीतून मिळविलेल्या यशामुळे ही भांवडे कौतुकास पात्र ठरली आहेत.
        माखणी (ता. गंगाखेड) सारख्या डोंगरी भागात जमीन जुमला नसल्याने इतरांच्या शेतात मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबात चार मुले असल्याने सातत्याने असलेल्या आर्थिक विवंचनेतून कुटूंब प्रमुखाने पत्नीसह जीवनयात्रा संपवली. त्यानंतर चार मुलांच्या पालनपोषणाचा निर्माण झालेला प्रश्न त्यातीलच मोठया असलेल्या भावाने उचलला. माखणी येथील केशवराव शिसोदे हे पत्नी व चार मुलांसह गावात वास्तव्यास होते. स्वत:ची जमीन नसल्याने इतरांच्या शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालवित होते. मात्र सातत्याने आर्थिक विवंचना तोंड द्यावी लागे. या विवंचनेतूनच 2012 मध्ये केशवराव यांनी पत्नीसह जीवनयात्रा संपविली. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर खाली जमीन व वर आकाश अशी पोकळी या चार भावांच्या आयुष्यात निर्माण झाली. सर्वात मोठा मुलगा आकाशने पालकत्वाची भूमिका स्विकारत मोलमजूरी करून या तिघांना शिकविण्याचा निर्धार केला.गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर कृष्णा तसेच आकार आणि ओंकार या जुळ्या भावांना परभणीतील भारत भारती या शाळेत प्रवेश देताना त्यांच्या निवासाची व्यवस्था खानापुर फाटा येथील एका आश्रमशाळेत केली. कृष्णा दहावीपर्यंत तेथे शिकला मात्र आकार व ओंकार हे दोघे सातवीला असतानाच ती आश्रमशाळा बंद पडली. त्यामुळे या दोघांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या या संघर्षाने यशाला गवसनी घालत एकाचवेळी पोलिस दलाच्या सेवेत प्रवेश मिळविला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !