मित्राच्या लग्नाला जाताना बीड जवळ अपघात ,३ ठार तर १ जखमी




बीड (प्रतिनिधी)  दि 23 जुन 2023 रोजी मध्यरात्री 02:15 च्या सुमारास नेवासाहून बीडच्या दिशेने जाताना पेंडगाव जवळ घोसापुरी शिवारात प्यासा हॉटेल जवळ मारुती सुझुकी सियाज कारचा अपघात होऊन  3 जण जागीच ठार झाले व 1 जण गंभीरित्या जखमी झाला असून मृतात धीरज गुणदेजा वय 30, (अंदाजे) रोहन वाल्हेकर वय,32 विवेक कानगुने,वय33 व जख्मी आनंद वाघ वय 28  राहणार सर्वजण नेवासा जिल्हा अहमदनगर हे सर्व बीडला मित्राच्या लग्नाला जाताना हा अपघात झाला गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडीने रोडवर तीन-चार पलट्या घेऊन रोडच्या बाजूला गाडी पलटी झाली यात गाडीचे अक्षरशः चुराडा झाला असून जखमींना बीड जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले यावेळी महामार्ग वाहतूक पीएसआय घोडके साहेब रवींद्र नागरगोजे सर, बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे लक्ष्मण जायभाये,रवी सानप तसेच महामार्ग पेट्रोलिंग टीमचे प्रमुख प्रतीक कदम,सुनील कवडे, राम गायकवाड तसेच महामार्ग रुग्णवाहिका डॉक्टर विशाल डोंगर, यशवंत शिंदे, ड्रायव्हर सुभाष नन्नवरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार