प्रख्यात सराफा व्यावसायीक रावसाहेब टाक यांचे निधन




अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई शहरातील मंडईबाजार भागात पाटील चौकातील प्रगती ज्वेलर्सचे सराफी पेढीचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब टाक यांचे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने शुक्रवारी सकाळी 8 वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 52 वर्षाचे होते. 

शहरातील पाटील चौकातील मंडई बाजारात मुख्य बाजार पेठेत सराफी पेढीचे मोठे दालन होते. आज पहाटे पासुनच टाक यांना शोशनाचा त्रास होवू लागला होता. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात दाखल केले असला त्यांना तिव्र स्वरूपाचा धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली रावसाहेब टाक हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर सुरूवातीच्या काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत होते. तालुक्यातील मौजे येल्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे. पुढे नौकरीत मन लागेला म्हणून व्यावसायात झेप घेत नौकरी सोडून धाडसाने सराफी व्यवसाय वाढविला. आपली विनयशिल वागणूक आणि सहानुभूतीपुर्ण वर्तवणूकीच्या बळावर त्यांनी शहरातील मुख्य बाजार पेठेत अद्यावत असे सराफी दालन बनविले. या शिवाय शहरातील विविध भागात प्रत्येक भावांना स्वतंत्र सराफी दुकान निर्माण करून दिले. यांच्या आकाली निधनामुळे व्यापारी वर्ग सामाजिक व राजकिय कार्यकर्त्यांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड, प्रतिष्ठीत व्यापारी बापु टाक, आश्रुबा टाक हे दोघे बंधु असून त्यांचा मोठा परिवार आहे. रावसाहेब टाक यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार