भेल सेकंडरी स्कूलमध्ये 9वा "आंतरराष्ट्रीय योगदिन" साजरा

 भेल सेकंडरी स्कूलमध्ये 9वा "आंतरराष्ट्रीय योगदिन" साजरा




परळी वै (प्रतिनिधी) :-

   येथील भा.शि.प्र.सं.अंबाजोगाई संचलित भेल संकुलामध्ये ९ वा "जागतिक योग दिन" योगाचार्य श्री बालासाहेब कराड आणि योगाचार्य श्री महादेव फड यांच्या उपस्थितीत आणि विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादामध्ये हर्षोउल्हासात संपन्न झाला.  ‌   यावेळी बोलतांना योगाचार्य श्री बालासाहेब कराड पूढे म्हणतात की, "योग ही एक अशी गोष्ट आहे की शरीर, मन, आत्मा व विश्व एकञित करते मानवी मन हे प्रफुल्लित ठेवण्यासाठी व विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रेरीत करण्याचे काम ही करते."तसेच योगाचे महत्त्व काव्यात्मक पध्दतीने पटवून देताना योगाचार्य श्री महादेव फड म्हणतात ,

      "योग रुप समाधानी,देवू केले शिवज्ञानी!

ध्यान शक्ती प्रभांतनी,योग मुक्ती संगोपनी!

रोग सारी चित्त मनी,हितकारी आरोग्यानी!सूर्योदय प्रारंभानी 

प्राणवायू योगासनी!"

        या प्रसंगी कार्यक्रमासाठी  श्री वसंतराव देशमुख (अध्यक्ष शा.समिती),  श्री विकासराव डुबे (अध्यक्ष शा. समन्वय समिती), श्री विष्णूपंत कुलकर्णी (सदस्य), श्री डॉ सतीष रायते (सदस्य), श्री दत्तापा ईटके (गुरुजी )(सदस्य),सौ शोभा भंडारी मॅडम (सदस्य), श्री एन एस राव (मुख्याध्यापक सीबीएसई), श्री परिक्षित पाटील (मुख्याध्यापक स्टेट) उपस्थित होते .पुढे बोलताना योग मार्गदर्शक योगाचार्य श्री महादेव फड (सर) आणि योगाचार्य श्री बालासाहेब कराड (सर) यांनी ध्यान धारणा करून मनावर नियंत्रण कसे मिळवायचे, चिंता द्वेष, क्रोध लोभ,या अडथळयातून मुक्ती कशी मिळवायची यासाठी हे प्रभावी साधन आहे असे म्हटले विद्यार्थी वर्गाने अनापान ध्यान साधना ही नियमित दहा मिनिटे केली तर अभ्यासात त्यांचे मन एकाग्र होते व ताणतणाव राहत नाही हे वैज्ञानिक तंञ आहे असे ही योगप्रशिक्षक यांनी विशद केले     

   या योगदिनाचे संयोजन क्रीडाशिक्षक श्री लक्ष्मण राडकर,श्री यशवंत कांबळे,प्रा राजेश गडदे, डॉ जगदीश कावरे यांनी केले.  सुञसंचलन श्री. नामदेव मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री श्रीकांत मुलगीर यांनी मानले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !