चि.आदित्य राजेश कांकरिया देशातील आय.आय. टी. प्रवेशासाठी पात्र



    परळी शहरातील प्रसिध्द आडत व्यापारी श्री.राजेश चंदूलालजी कांकरिया यांचे सुपुत्र चि.आदित्य कांकरिया याने 2023 मध्ये पार पाडलेल्या आय.आय.टी.मुख्य परीक्षेद्वारे भारत देशातील इंजिनीअरींग क्षेत्रातील अग्रगण्य आय.आय.टी.संस्थेत प्रवेशासाठी पात्र ठरला आहे.

   चि.आदित्य याने परीश्रम,जिद्द,चिकाटीद्वारे मिळविलेल्या दैदीत्यमान यशाबद्दल परभणी जिल्हयाचे अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे,विक्रीकर अधिकारी गौरीहर स्वामी व परळी न.प.चे नगरसेवक चेतन सौंदळे व राजेश कांकरिया वर्गमित्र मंडळाच्यावतीने चि.आदित्य व त्याच्या पालकांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला तसेच त्याच्या पुढील शैक्षणिक करीयरसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

चि.आदित्य कांकरिया आय.आय.टी.प्रवेशासाठी पात्र ठरल्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन व कौतूक केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !