पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी मिस्ड काॅल करण्याची राबविली मोहिम

 पंकजाताई मुंडे यांची परळीत 'संपर्क से समर्थन' अभियानांतर्गत हर घर संपर्क मोहीम 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी मिस्ड काॅल करण्याची राबविली मोहिम

सर्व सामान्य नागरिक ते छोटया दुकानादारापर्यंत मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

परळी वैजनाथ ।दिनांक २०।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीनं आजपासून "संपर्क से समर्थन" अभियान राबविण्यात येत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज या अभियानाची  सुरवात शहरात केली.  विविध भागातील नागरिक, छोटे व्यापारी, दुकानदार यांचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपच्या वतीनं २० ते ३० जून या कालावधीत राज्यभर    "संपर्क से समर्थन" अभियान राबविण्यात येत आहे. आज या अभियानाला पंकजाताई मुंडे यांनी

 सुरवात केली. सर्व सामान्य नागरिकांपासून ते भाजी विक्रेता, लाँड्री दुकानदार, फुल विक्रेते यांच्या त्यांनी प्रत्यक्ष भेटी घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील नऊ वर्षात केलेली कामगिरी आणि राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे पाॅम्प्लेट त्यांनी स्वतः नागरिकांना वितरीत केले तसेच 9090902024 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड काॅल करून  पंतप्रधान मोदींना समर्थन देण्याचं आवाहन नागरिकांना केलं. या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्येकांनी लगेच आपापल्या मोबाईलवरून मिस्ड काॅल करून पंतप्रधानांना समर्थन दिले. शहर व तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार