लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार





परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)

            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील कला व विज्ञान शाखेच्या १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२ वी बोर्ड परिक्षेत महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

                      येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात कला व विज्ञान शाखा आहे. या शाखेतील १२ बोर्ड परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन शुक्रवारी (ता.२३) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष मा. संजय देशमुख, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, प्रा. डॉ विवेकानंद कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कला शाखेतून १२ वी बोर्ड परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या नंदिनी जाधव, धनश्री गुट्टे, भाग्यश्री पांचाळ व विज्ञान शाखेतील धनश्री तांदळे, कल्याणी वडूळकर, स्नेह शिंदे यांचा व आई-वडीलांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृती चिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवल्याबदल वैष्णवी नागरगोजे, तेजस्विनी बनसोडे,नेहा राडकर, प्राची राजमाने, वैभवी स्वामी या विद्यार्थिनींसह इंग्रजी, हिंदी, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, संगीत, गृह विज्ञान, रसायनशास्त्र, गणित या विषयात महाविद्यालयातून पहिला व दुसरा क्रमांक पटकावल्याबदल प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ विवेकानंद कवडे, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा.प्रविण नव्हाडे यांनी, सुत्रसंचालन प्रा. प्रविण फुटके, आभार प्रा.विणा पारेकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.विशाल पौळ, प्रा.आचार्य मँडम, प्रा.आशिलता शिंदे आदिंनी मेहनत घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !