जप्त केलेली रेती घरकुलधारकांना देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

 जप्त केलेली रेती घरकुल धारकांना देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

रामेवाडी (कासारवाडी) तालुका परळी वै येथील शिवारामध्ये जप्त करून जमा केलेली रेती शासन निर्णयानुसार घरकुलधारकांना वाटप करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने परळी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पोहनेर, डिग्रस, तेलसमुख, बोरखेड, रामेवाडी यासह विविध गावांमध्ये अवैधरित्या वाळू साठा करण्यात आला होता. सबंधित पाच-सहा गावातील नागरिकांच्या रेट्यामुळे  प्रशासनानं ती  रेती जप्त केली असून जप्त केलेली रेती ही पुन्हा रेती माफियांच्या घशात न घालता शासन निर्णय नुसार जे घरकुल धारक आहेत त्यांना वाटप करावी. तसेच विशेष प्राधान्याने ही रेती गोदाकाच्या चार-पाच गावातील घरकुल धारकांना वाटप करण्यात यावी व उर्वरित रेती परळीतील सर्व गावातील घरकुलधारकांनाच वाटप करण्यात यावी. अशी लेखी निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेड च्या वतीने मागणी केली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !