भंगारवाल्याने ५४ हजाराचे दागिने पळविले 



केज :- गावात भंगार विकत घेण्यासाठी आलेल्या दोघांनी एका ५० वर्षीय महिलेच्या घरातून ५४ हजार रु. चे सोन्याचे दागिने पळवून पोबारा केला.

       दि. १२ जून रोजी केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे इंदुबाई श्रीहरी ठोंबरे वय ५० या घरी असताना गावात भंगार व भाकरीचे शिळे तुकडे खराब झालेले धान्याचे पीठ हे विकत घेण्यासाठी भंगारवाले आले होते. त्यावेळी त्यांना इंदूबाई ठोंबरे या त्यांना खराब पीठ विकण्यासाठी घरातून पिठाचा डब्बा घेऊन आल्या. त्या पिठाच्या डब्ब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने त्यांनी टेबलवर काढून ठेवले. पुन्हा घरातील शिळे भाकरीचे तुकडे आणण्यासाठी त्या घरात गेल्या. तेवढ्या वेळात त्या भंगारवाल्याने टेबलवर ठेवलेल्या दागिन्यांचे पाकीट घेऊन पोबारा केला. त्या पाकिटात अंगठी, बोरमाळ, कानातील फुले, गंठण, नेकलेस व मिनी गंठण असे एकूण ५४ ग्रॅम वजनाचे दागिने होते. इंदूबाई ठोंबरे यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते  त्यांचा भंगाराचा टेम्पो घेऊन पळून गेले. त्या नंतर इंदूबाई ठोंबरे यांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. 

त्या नंतर दि. १३ जून रोजी दुपारी १२:०० वा तो भंगारवाला दिसला; त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो थांबला नाही. तो मांजरसुंबा रोडने जाऊ लागला. त्या नंतर इंदूबाई ठोंबरे यांचे नातेवाईक कारभारी ढाकणे यांना सदर टेम्पोची माहिती दिली. त्या दोघांनी टेम्पोचा पाठलाग करून तांदळ्याचीवाडी फाट्याजवळ टेम्पोला  थांबविले. टेम्पो चालक व मालक यांना त्यांचे नाव गाव याची विचारपुस केली असता ते अखिल पठाण सलीम पठाण व त्याचा मुलगा रिहान पठाण हे होते. त्यांची ओळख पटल्या नंतर त्यांना असे सांगीतले. त्यावरुन मी त्यांना दागिने काल तुम्ही घेवुन गेला; ते दागिने परत द्या. असे म्हणाल्या नंतर त्यांनी  उडवा उडवीचे उत्तरे दिले. त्यांनी दागिने घेतले नाही व दागिने माहित नाहीत असे म्हणुन सांगीतले. 

दि. २० जून रोजी इंदूबाई ठोंबरे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अखिल पठाण सलीम पठाण व त्याचा मुलगा रिहान पठाण रा.तेलगाव नाका, बीड यांनी ५४ ग्रॅम सोन्याचे जुने वापरलेले दागिने ज्याची किंमत ५४ हजार ८०० रु. आहे ते चोरून नेले म्हणून त्यांच्या विरुद्ध गु. र. नं. ३६४/२०२३ भा. दं. वि. ३७९ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूरघाट दुरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक मेसे हे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !