परळी औष्णिक वीज  केंद्र कोळसा हाताळणी विभागाचा सन २०२१-२२ वर्षातील उत्कृष्ट  कामगिरी बद्दल "ब्लॅक डायमंड पुरस्काराने गौरव"




परळी/ प्रतिनिधी


परळी औष्णिक वीज केंद्र, कोळसा हाताळणी विभागाच्या वर्ष २०२१-२०२२ या कालावधीतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल "ब्लॅक डायमंड पुरस्कार" देऊन दिनांक ६ जुन २०२३ रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. याच बरोबर तंत्रज्ञ सुनिल ढोखळे विभाग सि अँड आय  संच क्रमांक ६/७ यांच्या वैयक्तिक उत्कृष्ट योगदानाबद्दल "विश्वकर्मा " पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


महाजनको कंपनीचे वर्ष २०२१-२२ चे मोटिवेशनल पुरस्कार जाहीर करण्यात आले आणि त्याचे वितरण दिनांक ६ जुन रोजी मुबंई येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक श्री डॉ. पी.अनबलगन साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा.संजय मारुडकर साहेब,(संचालक, संचलन ) श्री. अभय हरणे साहेब , (प्रभारी संचालक, प्रकल्प ), श्री राजेश पाटील साहेब ( प्रभारी संचालक, खनिकर्म ) आणि विश्वास पाठक, संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोळसा हाताळणी विभागाची कामगिरी ही नेहमीच सातत्यपूर्ण असल्यामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे.

  परळी कोळसा हाताळणी विभागाची ही  कामगिरी  महानिर्मितीच्या  १००० मे. वॅ.पेक्षा कमी क्षमता या विभागात उत्कृष्ट ठरली आहे. संच क्रमांक ६,७,८ कोळसा हाताळणी विभागाने उत्कृष्ट  तांत्रिक  कौशल्याचा आणि उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर करुन ही किमया साध्य  केली.


तंत्रज्ञ् श्री सुनिल ढोकळे हे सि अँड आय  विभागात कार्यरत असुन नेहमीच ते क्रियेटिव्ह कामात अग्रेसर असतात. त्यांच्या याच कार्याचा "विश्वकर्मा " पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

परळी औष्णिक विज केंद्राचे मा. मुख्य अभियंता श्री.प्रफुल्ल भदाणे साहेब, तत्कालीन मुख्य अभियंता श्री मोहन आव्हाड साहेब, उपमुख्य अभियंता श्री.हिम्मतराव अवचार साहेब, तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री श्रीधर नागरगोजे साहेब, सध्याचे कार्यकारी  अभियंता श्री सुरेश गर्जे साहेब व संच क्रं.८ चे प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.महादेव मुंडे साहेब यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे ही कामगिरी करणे शक्य झाले आहे.


कोळसा हाताळणी विभागातील  अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री शाहूराजे येवते व श्री आरोले , उप कार्यकारी अभियंता  ,सर्व सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता (सुव्यवस्था व संचलन), सर्व कर्मचारी (सुव्यवस्था व संचलन) आणि सर्व कंत्राटदार यांची मेहनत कामी आली.  या दैदीप्यमान कामगिरीबद्दल सर्व स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !