नगर परिषद आणि वैद्यनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने दिंडीतील वारकर्यांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात :-गोपाळ आंधळे 



परळी वैद्यनाथ दि.८(प्रतिनिधी)वारकर्यांचं  आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा आषाढी पालखी सोहळा दि.२९ जून रोजी आहे. त्यानिमित्त प्रभु श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री विदर्भ आणि मराठवाड्यातून शेकडो दिंड्या परळीत दाखल होत असतात. या वारकर्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. त्यामुळे परळी नगर परिषद आणि वैद्यनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने या भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात  सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे तालूका अध्यक्ष गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे केली आहे. 

  दोन वर्षाच्या कोरोना संकटा नंतर यावर्षी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा आषाढी पालखी सोहळा होत आहे .या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. पंढरपूर कडे जाणार्या पालख्यांपैकी शेकडो पालख्या या ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र परळी वैद्यनाथ येथून पुढे जात असतात. यामध्ये शेगावचे श्री गजानन महाराज, विदर्भातील ज्ञानेशकन्या  श्री संत गुलाब महाराज, संत जनाबाई यासह शेकडो छोट्या मोठ्या दिंड्या परळी शहरात मुक्कामी दाखल होत असतात. या दिंडीतील वारकर्यांना अनेक वेळा वैद्यनाथ मंदिर परिसरात उखड्यावर, रस्त्यावर, पायर्यांवरच झोपावे लागते, स्नानाची,शौचालयाची पण हिच परिस्थिती  असते. त्यामुळे परळी नगर परिषदेने मंदिर परिसरात तात्पुरत्या स्वरूपात स्नानासाठी आडोसा आणि फायबरचे शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच  धर्मवीर  छञपती संभाजी महाराज चौक, शामाप्रसाद  मुखर्जी उड्डाण पुल, रोडे चौक, राणी लक्ष्मीबाई टावर चौक,स्टेशन रोड  ते मंदिर पर्यंत रस्ता किमान आषाढी पर्यंत रोज दोन वेळा स्वछ करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला किटक नाशक पावडर टाकावी. पोलिस प्रशासनाने रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दुर करून प्रत्येक दिंडी सोबत कर्मचारी व्यवस्थे साठी नियुक्त करावेत. वैद्यनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने वारकर्यांसाठी भक्त निवास, मंगल कार्यालय आणि पार्किंग झोन मध्ये मंडप उभारून भावीकांची सोय करावी. तर शहरातील सामाजिक संस्था, राजकीय संघटनेच्या पदाधिकार्यानी भावीकांच्या स्वागतासाठी चौका चौकात स्वागत कमानी उभ्या कराव्यात.त्यांच्या फराळाची, जेवनाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.  शहरातील खाजगी मंगल कार्यालय चालकांनी पण पंधरा दिवस आपल्या मंगल कार्यालयात भावीकांना रहाण्याची सोय करावी. पालखी सोहळा ही महाराष्ट्राची धार्मिक अस्मिता आहे. तिचा सन्मान व सुविधा उपलब्ध करणं ही प्रत्येक हिंदू चे कर्तव्य समजून आपण आपल्या गावात वारकर्यांसाठी आप आपल्या परीने जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न करूत. हीच खर्या अर्थाने पांडुरंगाची सेवा ठरेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार