माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

 माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन 


परळी ,शहरातील  जिल्हा परिषद प्रशाले मध्ये तब्बल पन्नास वर्षानंतर वर्गमित्र दोन दिवस एकत्र येणार आहेत  सन 1972-73 व 73-74 मधील 10 वी बॅचच्या वर्ग मित्रांचा स्नेह मेळावा 24 व 25 जून रोजी परळीत आयोजित करण्यात आला आहे या स्नेह मेळाव्यास  जिल्हा परिषद प्रशाला परळीचे   महाराष्ट्रातून  माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत     


  जिल्हा परिषद प्रशाला परळी येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा निमित्त  दिनांक 24 जून शनिवार रोजी सायंकाळी 7 वाजता आर्यवैश्य समाज मंगल कार्यलय परळी येथे सर्व माजीविद्यार्थी एकत्र जमणार आहेत .सायंकाळी आठ वाजता स्नेहभोजन व  रात्री नऊ वाजता गायन ,,भक्ती गीते ,भजन ,एकांकिका  हे कार्यक्रम होणार आहेत व 25 जून रोजी रविवारी जिल्हा परिषद प्रशाळेत  सकाळी  8 वाजता चहा -नाष्टा ,नऊ वाजता वैजनाथ मंदिरात दर्शन ,भेट व दहा वाजता जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत एकत्रित येणार आहेत व अकरा वाजता गुरुजनांचा सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमास राज्यभरातून वर्गमित्र येणार असल्याची माहिती गोविंद कौलवार ,वैजनाथ सुत्रावे, वैजनाथ करमाळकर, उत्तम सावजी यांनी दिली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !