कु. योगेश्वरी राजेश मगर चे दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश




परळी वै. (प्रतिनिधी)...


 परळी शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी योगेश्वरी राजेश मगर हिने महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा इयत्ता दहावी मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. योगेश्वरी मगर ने दहावीच्या परीक्षेत 95.80 टक्के गुण घेतले आहेत.


    शालांत परीक्षेमध्ये  येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी श्री. राजेश मगर यांची मुलगी कु. योगेश्वरी मगर हिने घवघवीत यश संपादन केले आहे. कु. योगेश्वरी ही शहरातील नवाजलेल्या विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थीनी असून तिने दहावी बोर्ड परीक्षेत 500 पैकी 479 गुण घेतले आहेत. संस्कृत या विषयात तिने 98 गुण घेतले असून इंग्रजी विषयात 94 गणित मध्ये 97 सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयात 97 सोशल सायन्स मध्ये 97 तर मराठी मध्ये 79 गुण घेतले आहेत. कुमारी योगेश्वरी लहानपणापासूनच अत्यंत गुणी व हुशार असून तिने आतापर्यंत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करत अभ्यासामध्ये सातत्य राखले आहे. दहावीच्या शालांत परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करत कुमारी योगेश्वरी मगर या विद्यार्थ्यांनीने आपली शाळा शिक्षक वृंद तथा पालकांची मान उंचावली आहे. तिच्या या यशाबद्दल शहरातील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक प्रा. गंगाधर शेळके सर यांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी व उज्वल भविष्यासाठी शुभाशीर्वाद दिले आहेत. या यशाबद्दल कु. योगेश्वरी मगरचे विद्यावर्धिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच शहरातील विविध सामाजिक संस्था व इतर सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !