आरोपींना कडक शासन करा-कॉ. एड.अजय बुरांडे

 ■अक्षय भालेराव यांच्या हत्येच्या निषेधार्थ डी.वाय.एफ.आय.संघटनेची निदर्शने



आरोपींना कडक शासन करा-कॉ. एड.अजय बुरांडे


परळी / प्रतिनिधी


नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावात 1 जून रोजी अनेक वर्षापासून बंद केलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती का काढली? याचा मनात राग धरून अक्षय भालेराव या युवकाचा जातीय द्वेष भावनेने चाकूने वार करून जातीय गाव गुंडानी हत्या केली.


अक्षय भालेराव यांचा खून करणाऱ्याना फाशीची शिक्षा देऊन मयत अक्षय भालेराव याला तात्काळ न्याय देण्यात यावा.या मागणीला घेऊन सिरसाळा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी निदर्शने करण्यात आली.यावेळी मा.क.पा.जिल्हा सचिव कॉ. अजय बुरांडे यांनी सामाजिक एकता कायम राहावी यासाठी तरुणांनी एकत्र येवून जातीवादी शक्तिविरोधात लढा द्यावा लागेल.असे मनोगत व्यक्त करत आरोपींना तत्काळ अटक करून जलद न्यायालयात ही केस  चालवावी असे  मागणी केली यावेळी मा. क.पा.परळी सचिव कॉ.पोटभरे, कॉ.बडे सर, कॉ. सुदाम शिंदे, डी. वाय. एफ.आय.बीड  जि.सचिव विशाल देशमुख प्रशांत मस्के मनोज देशमुख,मदन वाघमारे विजय घुगे कॉ.प्रकाश उजगरे,पंडित शिंदे, जितेंद्र शिंदे,आकाश रोडे,अशोक जाधव , दीक्षांत शिंदे, निसर्ग रणखांब विकी शिंदे निलेश तरकसे दादा पोटभरे शवंत उजगरे,सतीश आरगडे,सुरेश ढवळे सह असंख्य तरुण उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार