परळीतील सुकन्येने मिळवली केंद्र शासनाची "सांस्कृतिक प्रतिभा खोज शिष्यवृत्ती"


 (परळी वै):

                         भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित परळी येथील शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य आणि एकमेवाद्वितीय भेल संस्कार केंद्रातील कु. स्वरश्री सुजित डोंगरे इयत्ता सातवी (सीबीएसई) मधील विद्यार्थिनीने केंद्र शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक प्रतिभा खोज शिष्यवृत्ती (कल्चरल टॅलेंट सर्च 2021 22) प्राप्त करून भेलच्या शिरपेच्यात आणखीन एक मानाचा नवीन तुरा सामील केलेला आहे.

        कु स्वरश्री सुजित डोंगरे ही भेल संस्कार केंद्राची एक प्रतिभावान आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारी विद्यार्थिनी आहे.तिने शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रातही अगदी लहानपणापासूनच नाव कमावण्यास सुरुवात केलेली आहे, खास करून संगीतक्षेत्र. अखिल भारतीय गांधर्व महामंडळ मुंबई अंतर्गत "मध्यमा" प्रथम शास्त्रीय गायनाचे शिक्षण तिने पूर्ण केलेले आहे. तिने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय गायनाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून अनेक पारितोषिक सुद्धा पटकावली आहेत. अगदी बालवायापासूनच वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे तिने तिच्या आईपासून म्हणजेच प्रा. सौ ज्योती सुजित डोंगरे यांच्याकडूनच घेतले आहेत. ही शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल तिचे वडील प्रा. सुजित डोंगरे यांनी या दोघींचेही अभिनंदन केले आहे." हिंदुस्तानी शास्त्रीय गायन" या विभागात संपूर्ण भारतात एकूण नऊ जणांची निवड केली जाते. यामध्ये कु. स्वरश्रीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे, तसेच महाराष्ट्र राज्यातून या शिष्यवृत्तीसाठी केवळ दोन विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यापैकी स्वरश्री डोंगरे ही एक आहे.

        यानिमित्त शालेय व्यवस्थापन समिती श्री वसंतराव देशमुख (अध्यक्ष) श्री विकासराव डुबे (अध्यक्ष, शालेय शालेय समन्वय समिती) श्री .विष्णुपंत कुलकर्णी (सदस्य) श्री. डॉ. सतीश रायते (सदस्य), श्री दत्तापा इटके गुरुजी (सदस्य) श्री. जीवनराव गडगूळ (सदस् श्री. राजेश्वर देशमुख (सदस्य) श्री. अमोल दुबे (सदस्य) श्री. तुषार देशमुख (सदस्य) सौ. शोभा भंडारी  (सदस्य) श्री. एन .एस. राव सर (मुख्याध्यापक, सीबीएसई) श्री. पाटील पी.व्ही (मुख्याध्यापक ,स्टेट) श्री बोतकुलवार सुनील (उपमुख्याध्यापक) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कु. स्वरश्रीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार