'सारथी'चा प्रस्ताव राज्य सरकारकडे नोव्हेंबर पासून प्रलंबित

 मराठा समाजातील 50 विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय तात्काळ मंजूर करा - धनंजय मुंडे







'सारथी'चा प्रस्ताव राज्य सरकारकडे नोव्हेंबर पासून प्रलंबित


प्रस्ताव मंजूर करून याच वर्षात लाभ मिळावा, यासाठी तातडीने प्रक्रिया राबवा - धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र


मुंबई (दि. 21) - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी नामांकित व निवडक विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील 50 विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती देण्याचा राज्य शासनाने निर्णय जाहीर केला होता, मात्र सदरचा सारथीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडे नोव्हेंबर 2022 पासून प्रलंबित आहे. हा प्रस्ताव तात्काळ मान्य करून याच शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती चा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.


धनंजय मुंडे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून, त्याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. 


अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पात्र असतात; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना माघार घ्यावी लागते. याचाच विचार करून सामाजिक न्याय विभागाच्या छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर 'सारथी' अंतर्गत मराठा समाजातील 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व पीएचडी चे शिक्षण घेण्यासाठी सारथीने प्रस्ताव तयार केला व नोव्हेंबर 2022 दरम्यान शासनास पाठवला असल्याचे समजते.


या निर्णयामुळे समाजातील अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी आशेला लागले असून राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडे नोव्हेंबर 2022 पासून सदर प्रस्ताव प्रलंबित असल्याने 2023-24 या शैक्षणिक वर्षात परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. 'क्यू एस' च्या जागतिक क्रमवारी मध्ये पहिल्या दोनशे मध्ये येणाऱ्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देखील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी अर्ज करता येत नाही व त्यातून विद्यार्थी आर्थिक विवंचनेत व नैराश्यात जाण्याची भीती आहे, असे धनंजय मुंडेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.


सदर परदेश शिष्यवृत्ती बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने तातडीने मंजूर करून व याच शैक्षणिक वर्षात संबंधित पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या दृष्टीने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करून अन्य प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. 


स्टुडंट हॅल्पिंग हॅन्डस करणार उपोषण


दरम्यान राज्य सरकारने वारंवार मागणी व पत्रव्यवहार करून देखील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. सदर प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार तातडीने कार्यवाही न झाल्यास स्टुडंट हेल्पिंग हॅन्डस संघटनेच्या वतीने पुण्यात उपोषण करण्यात येणार असल्याचा ईशारा स्टुडंट हेल्पिंग हॅन्डस चे समन्वयक कुलदीप अंबेकर यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार