8 वेळा दिली एमपीएससीची परिक्षा: अपयश आल्याने नैराश्यातून तरूणाने केली आत्महत्या




महाविद्यालयीन पदवी प्राप्त केल्यानंतर अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन एमपीएससीचा अभ्यास करून देखील आठ वेळा या परिक्षेत यश न आल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील चाळीस वर्षीय युवकाने शेतातील ऊसामध्ये विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपविले. ज्ञानेश्‍वर आण्णासाहेब आपेट या असे या तरूणाचे नाव आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील ज्ञानेश्‍वर आण्णासाहेब आपेट याने वयाच्या 22 व्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन एमपीएससीच्या अभ्यासक्रमासाठी पुणे येथे स्थायीक झाला. त्याने आत्तापर्यंत आठ परिक्षा एमपीएससीच्या दिल्या. परंतु एकाही परिक्षेत यश न आल्यामुळे तो हाताश झाला होता. 19 जून रोजी आपल्या शेतातील ऊसाच्या सरीमध्ये विषारी औषध प्राशन केले. 20 जून रोजी ऊसातील ड्रीप बदलण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याला सदरील युवकाचा मृतदेह आढळून आला. या नंतर बर्दापुर पोलिसांना याची माहिती देवून रितसर पंचनामा करण्यात आला. स्वाराती रूग्णालयात उत्तरणीय तपासणी केल्यानंतर मंगळवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्‍चात आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे. एमपीएससी परिक्षेत अपयश आल्यामुळे त्या नैराश्यातून आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नुकत्याच मे महिन्यामध्ये लागल्या एमपीएससीच्या निकालात देखील त्याला यश न आल्यामुळे त्याने थेट टोकाचे पाऊल उचचले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !